Friday, 16 May 2014

जळगाव मतदार संघात ए.टी.पाटील तर रावेर मध्ये रक्षा खडसे विजयी


जळगाव मतदार संघात ए.टी.पाटील तर रावेर मध्ये रक्षा खडसे विजयी

        जळगाव, दि.16- जळगाव जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदार संघांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सायंकाळी साडेचार वाजता पुर्ण झाली. जळगाव लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व विद्यमान खासदार ए.टी. नाना पाटील तर रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाच्याच रक्षाताई निखिल खडसे हे उमेदवार विजयी झाले. जळगाव लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी हे निकाल जाहीर केले.
             ए.टी.नानापाटील यांना एकूण सहा लक्ष 47 हजार 773 मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी  राष्ट्रवादी कॉंग्रेस  पार्टीचे डॉ.सतिष भास्करराव पाटील यांना दोन लक्ष 64 हजार 248 मते मिळाली. ए.टी.पाटील यांना तीन लाख 83 हजार 525 मताधिक्य मिळाले. रावेर लोकसभा मतदार संघात श्रीमती रक्षाताई खडसे यांना सहा लाख 5हजार 452 मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कांग्रेसचे मनिष जेन यांना दोन लाख 87 हजार 384 मते मिळाली. रक्षा खडसे याना तीन लाख 18 हजार 68 मतांचे मताधिक्य मिळाले.
              मतमोजणीसाठी जळगाव मतदारसंघासाठी एकूण 27 फे-या झाल्या व रावेर मतदारसंघासाठी 22 फे-या झाल्या. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. जळगाव मतदार संघात तीन हजार 268 इतकी तर रावेर मतदार संघात चार हजार 212 मते ‘नोटा’ म्हणजेच यापेकी कुणीही नाही च्या खाती गेली.
*  * * * * * * * * *
03 जळगाव लोकसभा मतदार संघ
क्र.
उमेदवाराचे नाव
पक्ष
मिळालेले मत
1

अे. टी. नाना पाटील
भाजपा
647773
2
बागुल व्ही. टी.
बसपा
10838
3
डॉ. सतीश भास्कराव पाटील
नॅकॉपा
264248
4
अबररार बेग सरवर बेग मिर्झा
रिप. पार्टी
3212
5
ॲड. अशोक दगडू शिंदे
प्रबुध्द रि. पा.
1708
6
आशा साहेबराव पाटील
मनसे
1579
7
नानासो एम. पी पगारे
राष्ट्र. जनता
1917
8
मोरे ईश्वर दयाराम
बहु.मुक्ती
2718
9
रागीब अहमद अब्दुल नबी बहादूर
स. पा.
2675
10
मामाश्री सुरेश पाटील
हिदुस्तान जनता
958
11
डॉ. संग्राम गोकुळसिंग पाटील
आप
7390
12
अशोक ताराचंद पाटील
अपक्ष
5801
13
इक्बाल रहेमान देशमुख
अपक्ष
2246
14
पाटील संदीप युवराज
अपक्ष
2879
15
डॉ. मुबीन अ. खालील अ.
अपक्ष
1676
16
ललीत गौरीशंकर शर्मा
अपक्ष
8140
17
विजय भिमराव निकम
अपक्ष
9614
18
सतिष भास्कर पाटील (नंदगांव बु.)
अपक्ष
6157
19
सतिष भास्कर पाटील ( मुडी प्र डांगरी)
अपक्ष
3998
20
सतिष भास्कर पाटील (वरखेडी)
अपक्ष
1537

एकूण वैध मते
--
9,87,064

एकूण अवैध मते
--
272

नोटा
--
3,268

एकूण

9,90,604
          
04 रावेर लोकसभा मतदार संघ
क्र.
उमेदवाराचे नाव
पक्ष
मिळालेले मत
1

खडसे रक्षा निखील
भाजपा
605452
2
भांडे दशरथ मोतीराम
बसपा
29752
3
मनिषदादा जैन
नॅकॉपा
287384
4
खाटीक मोहम्मद हारुन
सपा
4376
5
गायकवाड भगवान माधव
प्रबुध्द रि. पा.
1206
6
मन्यार शे. साजीद शे. कादर
माई. डोमो. पा.
1606
7
राजीव सत्येंद्र शर्मा
आम
3756
8
वामनराव माधव ससाणे
बहु.मुक्ती
1757
9
शेख मो. असगर सखावत
रिप. पा.
821
10
ज्ञानेश्वर आमले पाटील
फॉरवर्ड ब्लॉक
1220
11
अशोक त्र्यंबक इंगळे
अपक्ष
1131
12
डॉ. उल्हास वासुदेव पाटील
अपक्ष
21332
13
कादरी सानीया सैयद अली
अपक्ष
2658
14
गोविंदा नारायण गुंजाळ
अपक्ष
2844
15
झगडया पुरम्या पावरा
अपक्ष
3707
16
मनिषादादा सतिष जैन
अपक्ष
14599
17
मोहन शामराव चव्हाण
अपक्ष
8797
18
ज्ञानेश्वर दिवाकर वाणी
अपक्ष
3349
19
शेख शाकीर
अपक्ष
4009
20
शेख शाहेरा बी. जैनोद्दीन शेख
अपक्ष
1375
21
जे. जी. सुरवाडे
अपक्ष
1634
22
सुरेश हिरामण इंगळे
अपक्ष
1258
23
वंदना शिवाजी सोनवणे
अपक्ष
978

एकूण वैध मते
--
1005001

एकूण अवैध मते
--
39

नोटा
--
4212

एकूण

1009252


* * * * * * * * *

No comments:

Post a Comment