जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पदभार स्विकारला
जळगाव, दि.17 - जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार नूतन
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज सकाळी स्विकारला. मावळते जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर यांनी विधीवत त्यांचेकडे पदभार सोपविला. यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी धनंजय निकम,
उपजिल्हाधिकारी साजिद पठाण, मनोहर चौधरी , श्रीमती सावरकर तसेच महसूल
प्रशासनाचे व जिल्हाप्रशासनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नूतन जिल्हाधिकारी रुबल
अग्रवाल या 2008 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. महर्षि दयानंद विद्यापिठ, अजमेर येथून त्यांनी
अर्थशास्त्र, इतिहास या विषयांसह बीए ही पदवी प्राप्त केली आहे. 1/09/2010 ते
2/03/2011 याकालावधीत कुर्डूवाडी येथे उपजिल्हाधिकारी व 3/3/2011 ते 5/2/2014 या कालावधीत त्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय
जबाबदा-या सांभाळल्या आहेत.
* * * * * * *
सांस्कृतिक
कार्य राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान
यांचा
जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम
जळगाव, दि. 17 :- सामान्य प्रशासन,
माहिती व जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला व
बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण व अल्पसंख्याक विकास ( औकाफसह) राज्यमंत्री श्रीमती फौजिया
खान यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम
मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2014
रोजी सकाळी 7.00 वा.औरंगाबाद निवास्थान
येथुन चोपडाकडे प्रयाण, सकाळी 10.00 वा. शासकीय विश्रामगृह चोपडा येथे राखीव,
सकाळी 10.30 भगिनी मंडळ, चोपडा शैक्षणिक संकुल सुवर्ण महोत्सव कार्यक्रमास
उपस्थिती, स्थळ चोपडा, दुपारी 12.00 वा. राखीव, दुपारी 12.30 वा. चोपडा येथुन
इदगाव - जळगाव मार्गे औरंगाबादकडे प्रयाण.
* * * * * *
No comments:
Post a Comment