महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांना
विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन
नाशिक दि. 02:- महात्मा
गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त
(पुरवठा) श्री. रावसाहेब भागडे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री
यांच्या प्रतिमांना पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी
श्री. बिरे यांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसा, असहकार, खेड्याकडे चला अशा अनेक
शिकवणींना उजाळा दिला. तर श्री. देशपांडे यांनी लाल बहादुर शास्त्री यांचा जीवन
कार्याचा परिचय सांगितला. यावेळी
सर्वश्री उपायुक्त (सामान्य प्रशासन) व्ही. टि. जरे, उपायुक्त (रोहयो) पुरी,
सहाय्यक आयुक्त वाघमारे, तहसिलदार पवार व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
-----***-------
No comments:
Post a Comment