Tuesday, 1 October 2013

जळगाव, धुळे जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग क्र 6 भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे चौपदरीकरणासाठी वर्ग



जळगाव, धुळे जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग क्र 6
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे चौपदरीकरणासाठी वर्ग

             जळगाव, दि. 1 :- राजपत्र घोषित केल्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 ची लांबी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, औरंगाबाद, धुळे NHAl यांचेकडे दि. 1 एप्रिल 2013 पासून चौपदरीकरणासाठी वर्ग झाल्यामुळे रस्ता देखभाल / दुरुस्ती व अपघात, वाहतुकीसंबंधी, वाणिज्य, रहिवास प्रयोजनार्थ असलेली बिनशेती प्रकरणे तसेच बांधकामाविषयक परवानगी आणि पेट्रोलपंप, पेट्रोलपंप जोडरस्ता, ओएफसी केबल , मूल्यांकने इतर सर्व बाबी संबंधीचे ना-हरकत प्रमाणपत्र व अन्य सर्व तत्सम कामाविषयी प्रकरणासाठी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग जळगाव यांचेकडे पत्रव्यवहार न करता परस्पर NHAl यांचेकडे पत्रव्यवहार करावा. राजपत्रानुसार रस्ता वर्ग झाल्यामुळे तसेच रस्ता संबंधी मूळ कागदपत्रे NHAl यांचेकडे हस्तांतरीत केल्यामुळे हा रस्ता NHAl त्यांच्या अखत्यारीत येत असल्याचे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.
                  राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील कि.मी. निहाय NHAl  कार्यालये पुढीलप्रमाणे -राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 साखळी क्र. 360/0 ते 443/00 (बुलढाणा हद्द ते जळगाव जिल्हा हद्द) - मुक्ताईनगर, वरणगाव, भुसावळ, जळगाव, पाळधी बायपास पर्यत )- प्रकल्प संचालक NHAl भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (पी.आय.यु.) औरंगाबाद, बी-23 एन-4 सिडको, कामगार चौकाजवळ, औरंगाबाद दूरध्वनी 0240- 2471507 / 2481592, ई-मेल Aurangabad@nhai.org , राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 साखळी क्र. 443/0 ते 520/ 600 ( पाळधी बायपास, एरंडोल, पारोळा, धुळे शहरापर्यत)- प्रकल्प संचालक NHAl , भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्लॉट न. 11, मन्साराम नगर, सर्कीट हाऊस जवळ, साक्रीरोड, धुळे दूरध्वनी 02562- 276276, 276279, ई-मेल dhule@nhai.orgpiudhule@gmail.com  यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
* * * * * * * * *

No comments:

Post a Comment