Monday, 8 July 2013

गाई / म्हशी खरेदीसाठी 31 जुलै पर्यत अर्ज सादर करावेत



              जळगांव, दि. 8 :- दुधाळ संकरीत गाई / म्हशींचे वाटप करणे (सर्वसाधारण / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती ) या नाविन्यपूर्ण योजनेची अंमलबवजाणी करण्यासाठी
           या योजनेत 6 दुधाळ संकरीत गाई किंवा म्हशीचे वाटप करण्यांत येणार आहे. गाई / म्हशी  खरेदी अर्जाचा नमुना विहित नमुना, नियम अटी, शर्ती पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचे कार्यालयाकडून उपलब्ध आहे.
            एका गटाची संपूर्ण रक्कम 3 लाख 35 हजार 184 आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास रुपये 1 लाख 67 हजार 592 व अनुसूचित जाती प्रवर्ग लाभार्थ्यास रुपये 2 लाख 51 हजार 388 अनुदान राहील, उर्वरित रक्कम लाभार्थ्यांच्या स्वहिस्याची असेल.
            गाई / म्हशीची खरेदी प्राधान्याने व शक्यतो बाहेरील राज्यातून करणे आवश्यक राहील. गाई / म्हशी खरेदीसाठी आवश्यक नियम, अटी, शर्ती यांची पूर्तता केलेल्या परिपूर्ण अर्जच पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेकडे स्वीकारले जातील. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2013 असेल. यानंतर अर्ज स्विकारले जाणार नाही.
          एका गाई / म्हशीसाठी अधिकतम रक्कम रुपये 40 हजार असेल गाय / म्हैस खरेदीपूर्वी लाभार्थ्याला रुपये 30 हजार च्या अधिकतम मर्यादेपर्यत  गाई / म्हैशीच्या गोठयाचे बांधकाम व वैरण, खाद्य साठविण्याच्या रुपये 25 हजार शेडची उभारणी करावी लागेल. गोठयाचे बांधकामाचा आराखडा पशुधन विकास अधिकारी  (विस्तार) पंचायत समिती यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.
          योजनेत स्वयंचलित चारा कटाई यंत्राची खरेदी दरकरारानुसार करावयाची आहे. लाभार्थ्याच्या स्वहिश्याच्या रक्कमेचा धनाकर्ष जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे नावाने प्राप्त झाल्यावरच पुढील अनुदान हे कामाच्या प्रगतीनुसार देण्यात येईल. बँक प्रकरणाच्या बाबतीत मंजूर प्रकरणांतील लाभार्थ्याकडील खात्यात वर्ग करण्यात येईल. गाय / म्हैस गटाचा विमा 3 वर्षाचा उतरवावा लागेल. गाय / म्हैस मृत पावल्यावर विमा रक्कमेतून नविन गाय / म्हैस घ्यावी लागेल.  मागील वर्षातील पात्र अर्ज व नविन प्राप्त होणा-या पात्र अर्जाचा एकत्रित करुन निवड करण्यात येणार आहे. योजनेतील अनुदानाचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास अनुदानाची व्याजासह एकरक्कमी वसुली महसुली  कार्यपध्दतीने लाभार्थ्याकडून करण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगांव या कार्यालयाशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment