Monday, 8 July 2013

रक्तदाते व रक्तदान शिबीर आयोजकांचा 13 जुलै रोजी सत्कार



        जळगांव, दि. 8 :- समाजामध्ये रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी जागतिक रक्तदाता दिवस व महिना साजरा करण्यात येत आहे.
          समाजात याविषयी जागृती व्हावी यासाठी जागतिक रक्तदाता महिना निमित्त वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात  रक्तदाते ज्यांनी 5, 10, 15, 20, 25 किंवा यापेक्षा जास्त वेळा रक्तदान केले असतील व ज्यांनी रक्तदान शिबीर आयोजित केलेले असेल त्यांचा सत्कार समारंभ दि. 13 जुलै 2013 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या रक्तदात्यांनी 5 वेळेपेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेले असेल अशा रक्तदात्यांनी रक्त संक्रमण अधिकारी रक्तपेढी सामान्य रुग्णालय जळगांव यांचेशी दिनांक 11 जुलै 2013 पर्यत संपर्क साधावा असे आवाहन रक्त संक्रमण परिषद मुंबई  व‍ जिल्हा शल्यचिकित्स सामान्य रुग्णालय, जळगांव यांनी केले.

No comments:

Post a Comment