जळगांव, दि. 4 :- संघ लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली
यांचेमार्फत दिनांक 8 सप्टेंबर 2013 रोजी घेण्यात येणा-या कंम्बाईन्ड डिफेन्स
सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेकरीता एम्प्लॉयमेंट
न्युज (रोजगार समाचार) मध्ये जाहिरात दिनांक 25 मे 2013 मध्ये प्रसिध्द झालेली
आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम मुदत दिनांक 24 जून
2013 आहे. कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस
(CDS) या परिक्षेव्दारे
कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशनसाठी निवड करण्यात येत असते. जे उमेदवार पदवीधर
असून सीडीएस परिक्षेचा फॉर्म ऑनलाईन भरुन पाठवतील व रोजगार समाचार मध्ये दिलेल्या
शैक्षणिक शारिरिक वयोगट पात्रतेनुसार पात्र
आहेत अशाच उमेदवारांची निवड परिक्षापूर्व तयारी साठी छात्रपूर्व प्रशिक्षण
केंद्र नाशिकरोड, नाशिक येथे करण्यात येणार आहे. सीडीएस परिक्षेचा ऑनलाईन फॉर्म
भरणेसाठी http://www.upsconline.nic.in या वेबसाईट चा वापर करण्यात यावा.
वयोमर्यादा
आय.एम.ए , 02 जुलै 1990 ते 01 जुलै 1995 या दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय
युवक, नेव्हल ॲकेडमी 02 जुलै 1990 ते 01 जुलै 1995 या दरम्यान जन्मलेले अविवाहीत
भारतीय युवक, एअरफोर्स ॲकेडमी 02 जुलै 1991 ते 01 जुलै 1995 च्या दरम्यान जन्मलेले
अविवाहीत भारतीय युवक, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमी 02 जुलै 1989 ते 01 जुलै 1995 च्या
दरम्यान जन्मलेले विवाहीत व अविवाहीत भारतीय युवक, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमी (महिलांकरिता)
02 जुलै 1989 ते 01 जुलै 1995 च्या दरम्यान जन्मलेले अविवाहीत मुलं नसलेल्या विधवा
पुन्हा विवाह न केलेल्या, मुलं नसलेल्या घटस्फोटीत भारतीय महिला
शैक्षणिक
पात्रता : आय.एम.ए
व ओ. टी. ए मान्यताप्राप्त विदयापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा समकक्ष,
नेव्हल ॲकेडमी अभियांत्रीकी पदवीधर/ बी.ई , एअरफोर्स ॲकेडमी मान्यताप्राप्त
विदयापीठाचा (भौतिक शास्त्र व गणित 10 +2 स्तर विषयासह) पदवीधर किंवा बी. ई
कंम्बाईन्ड डिफेन्स
सर्व्हिसेसच्या परिक्षेची तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक
रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे (महाराष्ट्रातील नवयुवकांसाठीच) दिनांक 18
जून 2013 ते 31 ऑगस्ट 2013 या कालावधीत प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहेत. निवास
व प्रशिक्षणाची सोय शासनातर्फे मोफत करण्यात आलेली असून भोजन ( दररोज रुपये 54/-
घेऊन) अल्पदरात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी जिल्हयातील जास्तीत जास्त पात्र
उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालय, जळगांव येथे दिनांक 13 जून 2013 रोजी पदवी पर्यंतच्या सर्व मुळ
प्रमाणपत्र व गुणपत्रिकेसह आणि ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर त्याची प्रिंट घेऊन
मुलाखतीचे वेळेस दाखविल्या शिवाय उमेदवाराची निवड करण्यात येणार नाही. मुलाखतीचे
वेळी वस्तुनिष्ठ पध्दतीची लेखी परिक्षा व तोंडी मुलाखत जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी यांचे कडून घेतली जाईल.
अधिक माहिती करीता छात्रपूर्व
प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रमांक 0253 -2451031-
2451032 येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यख अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगांव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment