Saturday, 13 April 2013

तंटामुक्त गांव मोहिमेत युवकांनी सक्रीय सहभाग घ्यावा -पालकमंत्री गुलाबराव देवकर

           जळगांव, दि. 13 :- जिल्हयातील सर्व गावांमधील लोकांनी आपआपसातील लहान - लहान तंटे सामंजस्यांतून सोडविले पाहीजेत महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी  गावांमध्ये व्हावी म्हणून युवकांनी सक्रीय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषि राज्यमंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात आयोजित महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम सन 2011-12 पुरस्कार वितरण सोहळयात देवकर बोलत होते. यावेळी आमदार दिलीप वाघ, जि. प. अध्यक्ष सुरेश खोडपे, जिल्हाधिकारी  ज्ञानेश्वर राजूरकर,  मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, अपर पोलिस अधिक्षक एन. अंबिका, रुपसिंग तडवी, प्रांताधिकारी रविंद्र राजपूत, गणेश मिसाळ, तुकाराम हुलवडे, आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
            ना. देवकर म्हणाले गावांमधील लहान तंटयामुळे पोलीस यंत्रणा, न्याय यंत्रणा आदि वरील ताण वाढत असून यामुळे न्याय मिळण्यात ही दिरंगाई होत असते. तसेच कोर्ट - कचेरी यामध्ये वेळ व पैसा मोठया प्रमाणावर अपव्यय होतो. त्यामुळे  गावाचा विकास खुंटतो असे त्यांनी सांगितले.
            तसेच गावांमधील वाद गावातच सोडवून गावांचा विकास साधला जावा व अशा तंटामुक्त गावांना पुरस्कार देऊन गौरविल्यास इतर गावांना ही त्यापासून प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाने 2007-2008 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम सुरु केली असल्याचे ना. देवकर यांनी  सांगितले. कारण गावांमध्ये शांतता राहिल्यास शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी कार्यक्षमपणे होत असते. व त्यातून गावांचा सर्वांगीण विकास होतो. या कार्यात गावांमधील युवकांनी  ही सक्रीय सहभाग देण्याचे आवाहन त्यांनी केले.
            जिल्हयातील सर्व गावांमधील लोकांनी महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेत सहभागी होऊन गांवे तंटामुक्त करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश खोडपे यांनी केले.
            महात्म गांधी तंटामुक्त गांव मोहिम 2011-2012 अंतर्गत जिल्हयातील 66 गावांना पुरस्कार प्राप्त झाला असून आठ गावांना विशेष पुरस्कार मिळाला असल्याचे पोलिस उप अधिक्षक प्रकाश गायकवाड यांनी प्रास्ताविकात सांगितले.
            यावेळी तंटामुक्त पुरस्कार प्राप्त 66 गांवे व विशेष पुरस्कार प्राप्त  आठ गावांना  पालकमंत्री ना. देवकर  व मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराच्या रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी पुरस्कार प्राप्त गावांमधील  गांव तंटामुक्त समिती अध्यक्ष पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी आदिसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. सुमारे दीड कोटी रुपये बक्षीस रुपाने पुरस्कार प्राप्त गावांना देण्यात आले.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक नागेश  जाधव यांनी केले तर आभार अपर पोलिस अधिक्षक रुपसिंग तडवी यांनी मानले.
पुरस्कार प्राप्त गावांची तालुकानिहाय यादी
        पाचोरा तालुका -  वडगांव खु / प्र. पा, दिघी,  खेडगांव नंदीचे, परधाने, वेरुळी खु//, अंतुर्ली खु // प्र. पो. निपाणे, बांबरुड प्र. बो., भोरटेक खु // ., गोराडखेडा खु //, सारोळा खु//, टाकळी बु //, दुसरखेडा, माहीजी, लासगांव, कळमसरे, रामेश्वर, सार्वे बु // प्र लो., भोजे रावेर तालुका-  मोरगांव बु //, चिनावल, वाघोदा बु//, कुंभारखेडा, विटवा, सिंगत,  चोपडा तालुका -कुरवेल, कुष्णापुर, लोणी, पुनगांव, गोरगावले खु //, पंचक , अंमळनेर तालुका - अंचलवाडी, निसर्डी आमोदे, खडके, वाघोदे, दापोपरी बु//, मेहेरगांव, शाहपुर, भिलाली, यावल तालुका -कोरपावली सातोद, महेलखेडी, बोरावल खु//, थोरगांव, फैजपूर तालुका -  कोसगांव. पारोळा तालुका – शिरसोदे, चोरवड, पोपटनगर, नगांव, भोंडणे दिगर, जामनेर तालुका -  आंबिका होळ, हिंगोणे बु//., काळखेडे, निमखेडी / पिंप्री,‍ हिवरखेडे तवा., पिंपळगांव बु //, एरंडोल तालुका - टोळी खु//, पिंपळकोठा, जळू, भातखेडे, साकरी   ( ता. भुसावळ), सावखेडा, हिकसाई (ता. जळगांव.), हिंगोणे सिम (ता. चाळीसगांव), अंतुर्ली (ता. भडगांव.)  आदि
विशेष पुरस्कार प्राप्त गावे :-
          वडगांव खु //  प्र. पा., बांबरुड प्र. बो. , भोरटेक खु //, सारोळा खु//, टाकळी बु //, दुसखेडा, भोजे ( ता. पाचोरा) , शिरसोदे (ता. पारोळा)
पाचोरा तालुका प्रथम
        महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेत पुरस्कार प्राप्त गावांमध्ये पाचोरा तालुक्यातील 19 गावांचा समावेश असून पाचोरा तालुका तंटामुक्त मोहिम यशस्वीपणे राबविण्यात जिल्हयात आघाडीवर आहे. बांबरुड प्र. बो. या सुमारे 6 हजार लोक संख्येचे गांव जिल्हयात प्रथम ठरले असून विशेष पुरस्कार म्हणून 8 लाख 75 हजार रुपये बांबरुड गावाला प्राप्त झाले आहेत.                               

No comments:

Post a Comment