Wednesday, 13 March 2013

सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी नामिका तयार करणे बाबतची कार्यवाही


          जळगांव, दि. 13 :- 97 व्या घटनादुरुस्तीनुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 मध्ये सुधारणा करणेत आलेली आहे. सदर घटनादुरुस्तीनुसार राज्य शासनाने किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या प्राधिका-याने मान्य केलेल्या पध्दतीनुसार सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी  संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून सहकारी संस्थांचे लेखापरीक्षणासाठी नामिका तयार करण्याची कार्यवाही करणेत येत आहे. नामिकेसाठी प्राप्त अर्जानुसार पात्रता  यादी तयार करणे, छाननी करणे व या संदर्भात समन्वय करणेसाठी जिल्हास्तरावर समिती निर्माण करणेत आली असून सुनिल बनसोडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव या जिल्हा समितीचे समिती  प्रमुख आहेत. तसेच धिरज चौधरी, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था, जळगांव हे जिल्हा समितीचे उपप्रमुख तथा सदस्य सचिव आहेत. सनदी लेखापाल जिल्हा प्रतिनिधी परिक्षीत भदादे  आणि प्रमाणित लेखारीक्षक जिल्हा प्रतिनिधी आनंद सिंघवी हे कामकाजा पहात आहेत. ज्यांना सनदी लेखापाल, सनदी लेखापाल फार्म् प्रामणित लेखापरीक्षक यासाठी अर्ज  करावयाचे असेल त्यांनी दिनांक 7 मार्च 2013 ते दिनांक 21 मार्च 2013 पावेतो विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगांव, नवीन प्रशासकीय इमारत, टप्पा क्रमांक 3 , दुसरा मजला, आकाशवाणीच्या शेजारी जळगांव येथे जमा करावेत. अर्जाचा नमुना तसेच अनुषंगीक तपशिल सहकार विभागाच्या वेबसाईट sahakarayukta .maharashtra. gov.in  वर उपलब्ध असून अर्ज भरणेसाठी सुचना व सहकारी संस्थांच्या वर्गीकरणानुसार लेखापरीक्षकांची आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव याचा तपशिल देखील या वेबसाईटवर उपलबध आहे. त्याचप्रमाणे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संसथा, जळगांव कार्यालयात देखील अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी पात्र व्यक्ती / फर्म्स ची नामिका दिनांक 31 मार्च 2013 रोजी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेमार्फत प्रसिध्द करणेत येणार आहे. जळगांव जिल्हयातील सर्व सहकारी संस्थांनी दिनांक 31 मार्च 2013 रोजी प्रसिध्द होणा-या नामिकेतील लेखापरीक्षकांकडूनच आपल्या संस्थांचे सन 2012-13 चे लेखापरीक्षण दिनांक 30 सप्टेंबर 2013 चे आत पूर्ण करावे. असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगांव यांनी कळविले आहे. 

No comments:

Post a Comment