जळगांव, दि. 13 :- ग्रंथोत्सवाच्या
माध्यमातून नवीन पिढीमध्ये वाचन संस्कृती वृध्दीगंत होत आहे. परंतु वाचन
संस्कृतीची जोपासना करत असताना मायाबोलीला प्राधान्य देण्यात यावे, असे प्रतिपादन
महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.
महाराष्ट्र
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व जिल्हा माहिती कार्यालय, जळगांव यांचे संयुक्त
विदयमाने व. वा. वाचनालयाच्या सभागृहात आयोजित ग्रंथोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी श्री.
गुजराथी बोलत होते. यावळी ज्येष्ठ साहित्यिक किसन पाटील, उपसंचालक (माहिती)
देवेंद्र भुजबळ, जिल्हा माहिती अधिकारी रजेसिंग वसावे, साहित्यिक ज्ञानेश्वर मोरे,
श्रीमती माया धुप्पड, नामदेव कोळी, प्रभाकर महाजन आदि मान्यवर उपस्थित होते.
तसेच रसिक, वाचक, विद्यार्थी मोठया
संख्येने उपस्थित होते.
श्री.
गजराथी म्हणाले सन 2020 मध्ये भारत
महासत्ता व्हावा याकरिता वाचन संस्कृती वाढविणे आवश्यक आहे. यामुळे नवीन पिढीला
वाचन करत नाही म्हणून दोष न देता त्यांना वाचनाबाबतचे स्वातंत्र्य दयावे. तसेच
नवीन पिढीला शब्दाच्या पाठीमागचा विचार ग्रहण करण्याची शक्ती दिल्यास त्यांच्यात
वाचन संस्कृती वाढविणे श्क्य होईल असे त्यांनी सांगितले.
ग्रंथ
हया शब्दात सारे विश्व सामावले असून साहत्यि जीवनाला अर्थ प्राप्त करुन देत असते.
त्यामुळे व्यक्तीमत्व विकासासाठी श्रवण, दर्शन, वाचन, संभाषणाचा लाभ घेण्याचे
आवाहन गुजराथी यांनी केले. साहित्य हे समाजाच्या मनोरंजनाबरोबरच समाजाला
मानवतावादी बनविण्याचे काम करते, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन
पिढीने ज्ञान, विज्ञान, कथा, कादंबरी, संत साहित्य, बाल साहित्य आदिंचे चौफेर वाचन
करावे. तसेच वाचनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची सूचना श्री. गुजराथी
यांनी केली. तसेच वाचकांनी पूर्वग्रहीत दृष्टीकोन न ठेवता तटस्थपणे वाचन करुन वाचन
संस्कृतीची जोपासना करण्याचा उपदेश त्यांनी केला. तसेच ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून
वाचन संस्कृती वाढविण्याचा शासनाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे श्री. गुजराथी
यांनी सांगितले.
टेलिव्हिजनमुळे
वाचन संस्कृती कमी होत आहे. परंतू वाचन
संस्कृतीची अनेक अंगभूत वैशिष्टये असल्यामुळे वाचन संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती
असल्याचे साहित्यिक किसन पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. तर उपसंचालक
(माहिती) देवेंद्र भुजबळ यांनी ग्रंथोत्सव हा एक प्रकारे मिनी साहित्य, संमेलनच
बनले असल्याचे सांगितले.
जिल्हा
माहिती अधिकारी रजेसिंग वसावे यांनी प्रास्ताविकात ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून
ग्रंथ प्रसार, ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्री करुन वाचन संस्कृती वाढविण्याचा
उद्देश असल्याचे सांगितले तसेच नागरिकांनी दिनांक 14 ते 15 मार्च या कालावधीत
सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत ग्रंथोत्सवास भेट देण्याचे आवाहन केले.
प्रांरभी
ग्रंथोत्सवाचे उदघाटक व अध्यक्ष मा. अरुणभाई गुजराथी यांचे हस्ते दिपप्रज्वलन व
ग्रंथ विक्री स्टॉलचे फित कापून उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील यांनी केले तर आभार माहिती अधिकारी सुनील
सोनटक्के यांनी मानले.
ग्रंथ विक्री
स्टॉलला भेट
प्रांरभी
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते ग्रंथ विक्री केंद्र स्टॉलचे उदघाटन फीत कापूर करण्यात आले. यावेळी
त्यांनी ग्रंथाली प्रकाशन मुंबई, शासकीय मुद्रणालय, लोकराज्य स्टॉल, वैशाली
प्रकाशन, सत्यम प्रकाशन आदि 20 स्टॉलला भेट देऊन पुस्तकांची पाहणी केली.
No comments:
Post a Comment