जळगांव, दि. 2 :- पशुसंवर्धन खात्यामार्फत
गुरांमध्ये कृत्रिम रेतन कार्यासाठी सेवादात्याची निवड करावयाची आहे. त्यासाठी
उमेदवाराने शैक्षणिक अर्हता , दुचाकी वाहनाचा परवाना, रहिवाशी दाखला, अनुभव
इत्यादी कागदपत्रासह खालील नमूद केलेल्या तालुकानिहाय दिलेल्या तारखेस मा. जिल्हा
पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, महाबळ रोड, जळगांव हया ठिकाणी उपस्थित राहावे.
1) दिनांक
6 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी 10.00 वाजता जळगांव, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगांव,
एरंडोल तालुका .
2) दिनांक 7 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी
10.00 वाजता, यावल, पारोळा, अंमळनेर, बोदवड, चाळीसगांव तालुका
3) दिनांक 8 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी
10.00 वाजता जामनेर, भडगांव, चोपडा, रावेर, पाचोरा , वेळापत्रका प्रमाणे हजर रहावे
असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले
आहे.
No comments:
Post a Comment