जळगांव, दि. 7 :- जिल्हा महिला व बाल
विकास अधिकारी कार्यालय यांचे वतीने बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय
/ स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ , निराधार, उन्मार्गी
मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना
निर्माण होण्यासाठी बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांमधील मुले व इतर मुले
यांचेसाठी चाचा नेहरु बालमहोत्सव – 2013 दि.
8 फेब्रुवारी 2013 ते 10 फेब्रुवारी 2013 या कालावधीत जिल्हा क्रिडा संकुल, जळगांव
येथे जिल्हा स्तरावर घेण्यात येणार आहे त्यात विविध खेळ, वक्तृत्व स्पर्धा, निबंध
स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, इ. घेण्यात येणार आहेत, सदर महोत्सवाचे उदघाटन समारंभ
दि 8 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हा क्रिडा संकुल, जळगांव येथे
मा.ना. गुलाबराव देवकर, पालकमंत्री, जळगांव यांचे हस्ते होणार असल्याची माहिती
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
No comments:
Post a Comment