जळगांव, दि. 28 :- जिल्हयात
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ जळगांव यांचे संयुक्त विदयमाने एकाच
वेळी एकाच दिवशी 3 मार्चला या वर्षातील पहिली महालोकअदालत होत आहे. जळगांव येथे
जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात सकाळी
10.00 वाजता जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश कु. आय.के जैन यांचे
अध्यक्षतेखाली महालोकअदालतीस प्रारंभ होईल.
लोकअदालतीमध्ये भुसंपादन, धनादेश
अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी प्रकरणे तसेच
सेंट्रल बॅक ऑफ इडिया, स्टेट बॅक ऑफ इंडिया, भारत संचार निगम लि. आयडीया सेल्युलर
इ. चे खटलापुर्व प्रकरणे तसेच एकुण ज्या खटल्यांमध्ये कायदयाने तडजोड करता येते
असे संपुर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत.
महानगरपालिकेकडुन निवासी व खाजगी अनिवासी
गाळेधारकांनी दाखल केलेल्या अपीलांमध्ये एकुण कराच्या मागणी रकमेत बिलातील अनु.
क्रं. 2 पाणीपट्टीची रक्कम सोडुन इतर सर्व कराच्या रकमेवर म्यु. अपील दाखल झाल्यापासुन
चालु आर्थिक वर्षापर्यंत सरसकट 20 टक्के व महानगरपालिका मालकीच्या अनिवासी
गाळयांसाठी वरील पध्दतीप्रमाणे सरसकट 45 टक्के सुट देण्यास मान्यता देण्यात येणार
आहे.
अनेक बॅका व पतसंस्था यांनी फक्त चेकची
रक्कम अदा केल्यास तडजोडीची तयारी दर्शविलेली आहे आणि व्याज, दंडव्याज वकिल फी.
माफ करण्याची तयारी दर्शवुन तडजोड करण्यांस तयार असल्याबाबतचे जाहीर केले आहे.
ज्या पक्षकारांना तडजोडीने सदरचे आपली प्रकरणे निकाली काढायचे असतील अशा
संबधीत सर्व पक्षकार व त्यांचे वकिल यांनी उपस्थित राहुन तडजोडीने आपआपले खटले
निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली
काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांनासुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी
देण्यात आलेली आहे. तरी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा व जास्तीत जास्त खटले निकाली
काढुन त्याच दिवशी त्वरीत निकाल घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
जळगांवचे सचिव श्री एम.आर. पुरवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * *
No comments:
Post a Comment