Thursday, 3 January 2013

वेबसाईट वर अपलोड करण्यात येणारा शासन निर्णय डिजिटल सिग्निचर युक्त असणे बंधनकारक



         मुंबई, दि. 3 : शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात  येणारा प्रत्येक शासन निर्णय डिजिटल सिग्निचर केलेला असणे 6  जानेवारी 2013  पासून बंधनकारक करण्यात आले आहे.  या संदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आह. यामुळे
ई प्रशासनात महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
      राज्याचे मुख्य सचिव जयत कुमार बाँठिया यांची डिजिटल सिग्निचर असलेला पहिला शासन ‍िनर्णय 31 डिसेंबर,2012  रोजी नुकताच जारी करण्यात आला आहे. हा शासन निर्णय वेगळे कौशल्य असलेल्या नागरिकांनाही स्क्रीन रिडर, ब्रेल डिस्प्लेअर या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाचता येऊ शकणार आहे.

No comments:

Post a Comment