मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय
विभागामार्फत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त बुधवार दि. 1
ऑगस्ट 2012 रोजी दुपारी 3 वाजता यशवंतराव
चव्हाण केंद्र, मुंबई येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सन 2012-13
च्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक आणि समाजसेवक यांना
आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा अण्णा भाऊ साठे पुरस्कार दिला
जातो. प्रतिवर्षी 25 व्यक्तीं आणि 6
संस्था यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
या पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रुपये
25 हजार प्रती व्यक्तिस व संस्थेसाठी रोख रुपये 50 हजार असे आहे.
या
कार्यक्रमामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे लाभार्थ्यांना
कर्जाचे व अनुदानाचे धनादेश तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या
धनादेशाचे वितरण केले जाणार आहे.
सामाजिक न्याय व व्यसनमुक्ती
कार्यमंत्री, शिवाजीराव मोघे, ग्रामविकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री जयंत
पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, रोहियो व जलसंधारण
मंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालविकास,
मंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय, राज्यमंत्री, सचिन अहिर, आमदार तथा अध्यक्ष,
अनुसूचित जाती कल्याण समिती, रमेश बागवे, मुंबई महानगरपालिकेचे, महापौर सुनील
प्रभू, आमदार श्रीमती ॲनी शेखर, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
* * * * * *
No comments:
Post a Comment