"जय महाराष्ट्र" कार्यक्रमात
आज डॉ.सुरेश बारपांडे
मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित होणाऱ्या "जय
महाराष्ट्र", कार्यक्रमात शासकीय दंत
महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबादचे अधिष्ठाता डॉ. सुरेश बारपांडे यांची थेट मुलाखत मंगळवार दि. 31 जुलै 2012 रोजी रात्रौ 8 ते 9 या वेळेत प्रसारित होणार आहे.
या मुलाखतीत
दंत आरोग्याच्या सोयी-सुविधा या विषयावर चर्चा करण्यात येणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रुपलक्ष्मी
शिंदे करणार आहेत.
* * * * *
मंत्रालय लोकशाही दिन
6 ऑगस्ट रोजी
मुंबई, दि. 30 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोमवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
या दिवशी ज्या अर्जदाराने अर्जाच्या प्रपत्राच्या नमुन्यानुसार अर्जाची आगाऊ प्रत व त्यासह आवश्यक कागदपत्राच्या प्रती जोडल्या असतील व अर्ज स्वीकृतीबाबत त्यांना कळविण्यात आले आहे.
अशाच अर्जदाराना मंत्रालयात लोकशाही दिनामध्ये मुख्यमंत्र्यांना समक्ष निवेदन करण्यासाठी सोडण्यात येईल.
* * * * *
No comments:
Post a Comment