Thursday, 26 April 2012

पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम


जळगांव दि. 26 :- राज्याचे कृषि, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर हे दिनांक  27 एप्रिल ते 1 मे 2012 या कालावधीत जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
     शुक्रवार दिनांक 27 एप्रिल 2012 रोजी सकाळी 9-30 वाजता शासकीय मोटारीने जळगांवहून कनाशी ता. भडगांवकडे प्रयाण, सकाळी 11-00 वाजता कनाशी ता भडगांव येथे आगमन व श्रीचक्रधरस्वामी मंदिर उदघाटन सोहळा व अखिल भारतीय महानुभव परिषद मेळाव्यास उपस्थिती, दुपारी 2-00 वाजता शासकीय मोटारीने कनाशी ता. भडगांवहून परभणीकडे प्रयाण.
     शनिवार दिनांक 28 एप्रिल 2012 रोजी सायं. 7-00 वाजता परभणीहून जळगांवकडे प्रयाण, रात्री 12-00 वाजता जळगांव शासकीय विश्रामगृह पद्मालय येथे आगमन व जळगांव मुक्काम. रविवार दिनांक 29 एप्रिल  2012 रोजी मतदार संघासाठी राखीव व जळगांव मुक्काम.
     सोमवार दिनांक 30 एप्रिल 2012 रोजी सायं. 7-00 वाजता संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती स्थळ रेल्वे खेलकूद महोत्सव मैदान, भुसावळ व जळगांव मुक्काम., मंगळवार दिनांक 1 मे 2012 रोजी सकाळी 8-00 वाजता महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या बावन्नाव्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभ स्थळ - पोलीस परेड ग्राऊंड, जळगांव. सकाळी 11-00 वाजता राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम पुरस्कार वितरण समारंभ स्थळ जे.डी.सी.सी.बॅक हॉल, जळगांव. दुपारी 3-00 वाजता धरणगांव पाणी टंचाई आढावा बैठक स्थळ - पंचायत समिती हॉल, धरणगांव, रात्री 11-40 वाजता 12106 अप विदर्भ एक्सप्रेसने मुंबई सी.एस.टी.कडे प्रयाण

No comments:

Post a Comment