Thursday, 5 June 2025

सिताराम भाई बिर्ला, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एरंडोल येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन

              जळगाव, दिनांक  05 (जिमाका वृत्त ) :  सिताराम भाई बिर्ला, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एरंडोल, जि. जळगाव येथे दि. ०६ जून २०२५ रोजी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता होणार असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

            कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख वक्ते प्रविण महाजन हे ‘कुटुंबप्रबोधन’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

              या कार्यक्रमात संस्थेच्या प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात स्थानिक नागरिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच माजी प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे पालक सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment