जळगाव, दिनांक 26 जानेवारी ( जिमाका : २६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव विमानतळावर उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. विमानतळ संचालक श्री. हर्ष त्रिपाठी यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले आणि उपस्थितांना संबोधित करताना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद केले.
प्रजासत्ताक दिनाचा उत्सव केवळ देशभक्तीची भावना वाढवणारा नव्हे, तर समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विमानतळ प्रशासनाने विशेष प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment