जळगाव, दिनांक 23 जानेवारी (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 25 जानेवारी, 2025 रोजी संपूर्ण जिल्हाभरात मतदान केंद्र, विधानसभा मतदार संघ व जिल्हास्तरावर 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसाचा विषय 'नथिंग लाइक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर' असा आहे.
त्याअनुषंगाने, आपल्या अधिपत्त्याखालील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सर्व अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम दि.24 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजीत करण्यात यावा व या बाबतचा अहवाल फोटोसह जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव निवडणूक शाखेत येथे पाठवावा अशा सुचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment