जळगाव, दिनांक
24 ऑक्टोबर (जिमाका वृत्त) : विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जळगाव शहर विधानसभा मतदार संघाकरीता 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या
दिवशी जे अधिकारी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत आहेत अशा अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडील
मतदानापूर्वी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन
करण्यात आले आहे.
ज्यामध्ये अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान करुन घेण्याच्या नियोजनासाठी
त्या कर्मचाऱ्यांचे फॉर्म नंबर 12 ड भरून घेणे, त्यांच्यासाठी टपाली मतदान केंद्र उभारणे
इत्यादी या बाबींचा सामावेश आहे. तरी सर्व
कर्मचाऱ्यांना एक नोडल अधिकारी नेमून माहितीसह त्यांना या कार्यालयास 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.00 वाजता आढावा सभेला उपस्थित राहण्याच्या
सुचना कराव्यात आणि त्यांच्यासोबत नोडल अधिकारी नियुक्ती आदेशाची प्रत
पाठवावी. तसेच किती आपल्या अधिनस्त किती कर्मचाऱ्यांना ही सुविधी हवी आहे ? यांच्या
लेखी माहितीसह त्यांना पाठवावे जेणेकरुन या विषयाचे नियोजन करणे सुलभ होईल अशा सुचना उपविभागीय अधिकारी जळगाव तथा निवडणूक निर्णय अधिकारी
विनय गोसावी यांनी दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment