Monday, 9 September 2024

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष

 राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष
मा. श्री. अंतरसिंग आर्या
१२ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर

जळगाव, दिनांक 09 ( जिमाका ) : मा. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष मा.श्री अंतरसिंग आर्या हे दिनांक १२ व १३ सप्टेंबर २०२४ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दिनांक १२ सप्टेंबर, रोजी सकाळी सेंधवा (मध्यप्रदेश) येथून सकाळी ११.०० वाजता जळगाव जिल्हयात येतील व दौऱ्यामध्ये प्रामुख्याने एकपेड मां के नाम या संकल्पनेतून वृक्षारोपण करणे, पेसाग्रामपंचायत, आश्रमशाळा भेट व वनहक्क समिती, वनहक्क प्राप्त लाभार्थी यांचेसोबत चर्चा करतील व आदिवासी भागामध्ये पाहणी करतील.

दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजी आदिवासी भागातील रस्ते, आरोग्यसु‌विधा, पाणीपुरवठा इ. बाबतचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आहेत. व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमासोबत चर्चा करतील, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अरुण पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000000

No comments:

Post a Comment