पालकमंत्री अनिल पाटील सर्वांना स्वावलंबी आणि समृद्ध
करण्यासाठी शासनाच्या योजनांची आखणी आदिवासी
विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणाचा आदेश वितरण सोहळा संपन्न
नंदुरबार, दिनांक 17 ऑगस्ट, 2024 (जिमाका वृत्त)
आज नंदुरबार शहरात आल्यानंतर शासनाचा प्रतिनिधी या नात्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्यांनी ज्या पद्धतीने माझे स्वागत केले, त्यामुळे मी अक्षरश: भारावून गेलो आहे. बहिणी आणि युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हिच शासनाने राबवलेल्या या योजनांच्या यशाची खरी पावती असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती नियंत्रण, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.
ते
आज शहरातील छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या
शुभारंभ व मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या आदेश वितरण प्रसंगी बोलत होते.
यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमशा पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, रतन पाडवी अभिजित
मोरे, जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद
पवार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी, कृष्णा राठोड (जि.प.), कौशल्य
विकास , रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांच्यासह विविध यंत्रणांचे
अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
मुलींच्या
सक्षमीकरणासाठी सुरु केलेल्या लेक लाडकी योजनेत चालू वर्षात 1 हजार मुलींच्या बॅंक
खात्यावर 5 हजार रूपयांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. तरुणांना
खाजगी तसेच शासकीय आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा, म्हणुन सुरु केलेल्या
“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजनेत जिल्ह्यात 2 हजार उमेदवारांना प्रथम टप्प्यामध्ये
लाभ मिळणार असुन सध्या 617 उमेदवार या योजनेंतर्गत कामावर रुजू झालेले आहेत. आज 63
लोकांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीचे आदेश वाटप करण्यात आले आहे.
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहे. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सर्व कुटुंब नजरेसमोर ठेवून योजना तयार केल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना व यासारख्या काही योजना यापूर्वी मध्य प्रदेश आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये राबवल्या गेल्या आहेत. त्यांची फलश्रृती आणि त्यातून सर्वसामान्य माणसाचे झालेले समाधान लक्षात घेवून महाराष्ट्र शासनानेही आता अशा प्रकारच्या योजना हाती घेतल्या आहेत. या सर्व योजना अतिशय विचारपूर्वक सुरू करण्यात आल्या आहेत. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरूणांमध्ये प्रशिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आदिवासी विकास विभागाने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना गाईंचे वितरणाची योजना सुरू केली, ती योजना आता सर्वांसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर राबवली जाणार आहे. सर्व सामान्य जनतेच्या डोक्यावर असलेले वीजबिल, रोजगार, पाणी यासारख्या प्रश्नांवर शासनाने प्राथमिकता दिली असून शहरे आणि गावे या सर्वांना बारमाही पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.
यावेळी
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील 06 लाभार्थी महिला भगिनींना प्रातिनिधिक स्वरूपात
धनादेश वितरीत करण्यात आले, तसेच त्यांनी यावेळी आपल्या बोली भाषेतून मनोगतही व्यक्त
केले. त्यात सावित्री सुभाष पाडवी, नंदिता उखाजी वसावे, अरुणा शरद राठोड, पूनम कृष्णा
बागुल, उषा सुदाम भिल, अनिता आत्माराम गावित यांचा समावेश होता.
आज
झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यातील
21 शासकीय आस्थापनांमधील 63 पदांवर युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात
नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आले.
या
कार्यक्रमानंतर पुण्यातील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी येथून
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते
व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत
झालेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थित अतिथी व लाभार्थी तसेच नागरिक
यांच्यासाठी प्रसारीत करण्यात आले.
No comments:
Post a Comment