Monday, 12 August 2024

‘हर घर तिरंगा’

 ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात 13, 14,15 ऑगस्ट  घरोघरी तिरंगा लावण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जळगाव,  दिनाक 12  ऑगस्ट (जिमाका) : भारताच्या ७८ व्या स्वातंत्रय दिनानिमित्त भारतीय जनतेमध्ये व विशेषतः नवीन पिढीच्या युवकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत  व्हावी यासाठी     “ हर घर तिरंगा” म्हणजेच घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत पातळीवर राबविण्यात येत आहे. या अभियानात दि १३. १४ व १५ ऑगस्ट, २०२४ या तीनही प्रत्येक घरोघरी तसेच दुकान, खाजगी आस्थापना व सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. सदर अभियानात सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

हर घर तिरंगा अभियानात आपल्या तसेच दुकान, खाजगी आस्थापनेवर राष्ट्रध्वज लावण्यात यावा. राष्ट्रध्वज लावतांना ध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून harghartiranga.com वेबसाईटवर अपलोड करावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी केले आहे.

0000000000

No comments:

Post a Comment