शिष्यवृतीचे अर्ज रद्दबातल झाले असतील अशा
विद्यार्थ्यांनी परत 30 जून, पर्यंत अर्ज सादर करावे
जळगाव, दिनांक 24 जून, 2024 ( जिमाका ) : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने अथवा नजरचुकीने Right to Giveup हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृतीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अशा विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे 30 जून, 2024 पर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे.
याबाबत विद्यार्थ्याने आपले महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य login मधून आपला अर्ज Revert Back करुन घेणे आवश्यक आहे. Revert Back झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या Login मधून ऑनलाईन फेर सादर करणे आवयक राहील. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेर सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्याची राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन सहाय्य्क आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी केले आहे.
0 0 0 0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment