Tuesday, 28 March 2017

जिवनात नेहमी आव्हाने स्विकारा : व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे


जिवनात नेहमी आव्हाने स्विकारा : व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे
       चाळीसगाव दि. 28 (उमाका वृत्तसेवा) :  जिवनात नेहमी आव्हाने स्विकारा यशस्वी झालात तर प्रतिनिधीत्व कराल आणि अपयशी झालात तर इतरांना मार्गदर्शक ठराल असे गौरवोदगार भारतीय नौसेनेचे व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे यांनी आज केले.
            व्हॉईस अॅडमिरल पदी बढती झाल्यानंतर चाळीसगांवकऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय महाविद्यालयात आयोजित भव्य असा नागरी सत्कार स्विकारतांना ते बोलत होते.
            यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन, आमदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिकुमार पाण्डे, उप विभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, कार्यक्रमाचे आयोजक शरद मोराणकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना सर्वप्रथम श्री.भोकरे म्हणाले जनरल नातुंचा मला अभिमान वाटतो. कर्तव्यावर असतांना मातृभुमीत येतांना खुप आनंद वाटतो. गेले 34 वर्ष नौदलात कर्तव्यावर असतांना कुटूंबाची साथ लाख मोलाची ठरली. जन्म भडगांव येथे झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण कासारी, बोलठाण, नागद येथे पुर्ण केल्यानंतर साताऱ्याच्या सैनिकी शाळेतून माध्यमिक शिक्षण पुर्ण केले, तर लष्करी शिक्षण पुण्याच्या राष्ट्रीय शिक्षण प्रबोधिनीत (एन.डी.ए.) घेतले. सध्या भारतीय नौदल अकादमीचे प्रमुख ही अतिरिक्त जबाबदारी असून भारताच्या पानबुडी विभागाचे पहिले अधिकारी म्हणून कामगिरी बजावतांना भारतमातेची सेवा करण्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले.
            पुढे बोलतांना श्री.भोकरे म्हणाले, भारत हा तरुणांचा देश आहे. लष्करी शिक्षणातील खडतर प्रशिक्षण हे शालेय जिवनातही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. देशाला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभलेला असून कच्च्या तेलासह मोठ्या प्रमाणात व्यापारी वाहतुक ही जलमार्गाने होत असते. या ठिकाणी प्रामुख्याने सागरी सुरक्षा पुरवितांना मोठी कसरत करावी लागते. खान्देशातील तरुणांमध्ये नौदलाविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे याक्षेत्रात खान्देशी तरुणांमध्ये उदासिनता दिसून येते. भविष्यात खान्देशातील तरुणांमध्ये नौदलाविषयी प्रबोधन करुन या माध्यमातून देशसेवेसाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
            शैक्षणिक जिवनातील अनुभव कथन करतांना लष्करी शिक्षणातील कठोर परिश्रमांचे अनुभवही त्यांनी उपस्थितांना यावेळी सांगितले.
            शुन्याची निर्मीती, देशाचे रक्षणासह क्रिडा क्षेत्रात भरीव कामगिरी करुन यशस्वी ठसा उमटविणारे व्यक्तीमत्व जन्माला घालणाऱ्या चाळीसगांवच्या मातीचा अभिमान वाटतो असे गौरवोदगार राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांनी आज काढले. यशस्वी शिखर गाठल्यानंतरही जन्मभुमीची ओढ व आत्मीयता नक्कीच कौतुकास्पद असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यशाच्या शिखरावर सर करणाऱ्या तालुक्यातील व्यक्तींचा आदर्श खान्देशातील विद्यार्थी, नागरिकांसह कष्टकऱ्यांनी घेण्याचे आवाहन ना.गिरीष महाजन यांनी यावेळी केले.
            पाण्यावर साम्राज्य करणारे व्हॉईस ॲडमिरल सुनिल भोकरे तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या माध्यमातून होणारे काम प्रेरणादायी आहे. चाळीसगांवच्या भुमीतून जन्माला आलेल्या व खान्देशाचे नाव उज्वल करणाऱ्या सर्व सत्कार्थ्यांना अभिवादन करुन चाळीसगांवकरांच्या वतीने अभिनंदण आमदार उन्मेश पाटील यांनी यावेळी केले.
            यावेळी व्हॉईस ॲडमिरल सुनिल भोकरे यांचे वडील वसंत वाणी, कार्यक्रमाचे आयोजक शरद मोराणकर, सि.सि.वाणी यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमास उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्याशी हितगुंज साधून त्यांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत तरूणांना प्रेरणा मिळेल, त्यांच्यावर कुठलेही दडपण न आणता त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक पालकाने प्रयत्न करण्याचे आवाहन  श्री.भोकरे यांनी यावेळी केले.


* * * * * * * *

Monday, 27 March 2017

भडगांव येथे मुद्रा लोन मेळाव्याचे आयोजन सुशिक्षीत बेरोजगारांनी लाभ घ्यावा : तहसिलदार वाघ

भडगांव येथे मुद्रा लोन मेळाव्याचे आयोजन
सुशिक्षीत बेरोजगारांनी लाभ घ्यावा : तहसिलदार वाघ
           चाळीसगाव दि. 27 (उमाका वृत्तसेवा) :   तहसिल कार्यालय, भडगांव यांच्या वतीने गुरूवार दिनांक 30 मार्च, 2017 रोजी लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालय, भडगांव येथे मुद्रा लोन योजनेच्या अनुषंगाने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते होणार आहे.
            या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी विधानसभा सदस्य किशोर पाटील उपस्थित राहणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुनिल पाटील, पंचायत समितीचे सभापती, जि.प.सदस्य, नगरपालीकेचे नगराध्यक्ष तसेच सर्व पं.स.सदस्य, नगरसेवक आदी उपस्थित राहणार आहेत. सदर मेळावा रोटरी क्लब पाचोरा/भडगांव व मास्टरलाईन फाऊंडेशन भडगांव यांचे सहकार्याने आयोजित केलेला असून पाचोरा भडगांव रोटरी क्लबचे अध्यक्ष सुयोग जैन तसेच युवा उद्योजक समीर जैन हे मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.
            सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना शासनाच्या ध्येय धोरणानुसार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातुन उद्योजक निर्माण व्हावेत या उदात्त हेतुने मा.प्रधानमंत्री यांचे संकल्पनेतून केंद्रशासनाने 8 एप्रिल, 2015 रोजी मुद्रा बँक योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच योजनेची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी लाभार्थ्यांना योजनेची माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे विविध बँकांचे स्टॉल देखील या ठिकाणी उभारण्यात येणार असून त्या माध्यमातून सर्व प्रकारची माहिती व अर्थ सहाय्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने तालुक्यातील स्वयंरोजगार, व्यवसाय करणाऱ्या युवक-युवतींनी तसेच होतकरु बेरोजगारांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुद्रा लोन मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन भडगांवचे तहसिलदार सि.एम.वाघ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *

Wednesday, 15 March 2017

ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन ही काळाची गरज


ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन ही काळाची गरज

           चाळीसगाव दि. 15 (उमाका वृत्तसेवा) :  जागृत ग्राहक, तत्पर संघटना, प्रामाणिक दुकानदार व गतीमान प्रशासन यांनी ग्राहकांच्या न्याय व हक्कासाठी तत्परता दाखवून ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन केल्यास समाज समर्पित अशा जागृत ग्राहक निर्मीतीसाठी वेळ लागणार नाही  असे प्रतिपादन आज अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष रमेश सोनवणे यांनी केले.
            जागतिक ग्राहक दिनानिमीत्त ग्राहक प्रबोधनासाठी तहसिल कार्यालयामार्फत तहसिल कार्यालयाच्या सभागृहातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण, उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी बाबासाहेब चंद्रात्रे, ग्रंथमित्र अण्णा धुमाळ, सर्पमित्र राजेश ठोंबरे, आनंदा साळुंखे, विकास वाणी, विवेक चौधरी, अरुण पाटील, विजया पवार यांच्यासह तहसिलदार कैलास देवरे, विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता नरेंद्र सोनवणे, तालुका कृषी अधिकारी  राजपुत, वैध मापन शास्त्र कार्यालयाचे संजय देशपांडे, निवासी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नानासाहेब आगळे, जी.ई.भालेराव, संदेश निकुंभ, यांच्यासह तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            महिला ग्राहकांचे फसव्या जाहिरातींमुळे फसवणूकीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने त्यांना घराबाहेरील व्यवहारासाठी वंचित रहावे लागते. यासाठी महिलांना स्वावलंबनाचे धडे देतांना जागृत महिला ग्राहक निर्मीतीकरिता त्यांना प्रबोधन देण्यासाठी महिला मेळाव्याचे आयेाजन करणे गरजेचे असल्याचे उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील यावेळी म्हणाल्या.        
 माहितीच्या अधिकाराबाबत ज्या प्रकारे जनजागृती होऊन त्याचा वापर मोठया प्रमाणावर होतांना दिसून येतो त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तहसिलदार कैलास देवरे यांनी  आयोजित जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात केले. यावेळी ते म्हणाले ग्राहकांच्या न्याय व हक्कासाठी जनजागृती करण्यासाठी शासकीय यंत्रणा तत्पर असून यात ग्राहकांचा सहभागही महत्वाचा असल्याचे ते यावेळी म्हणाले. ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर, 1986 साली पारित झाला असून ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापनाही प्रत्येक जिल्हयात झाली आहे. मात्र अपुर्ण माहिती व शिक्षणाचा अभावामुळे ग्राहक याचा उपयोग करतांना दिसून येत नाही याची खंत वाटते. म्हणून या कायद्याबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
            यावेळी बाबासाहेब चंद्रात्रे म्हणाले की, अर्थ व्यवस्थेत ग्राहकाचे स्थान महत्वाचे असूनही त्यांचे अस्तित्व ओळखण्यास कोणी तयार नाही. महागाई, फसवणूक या भडकत्या ज्वालांमध्ये तो रोज होरपळून निघत आहे. ग्राहक हे आमचे माय-बाप आहेत असे म्हणतच या ग्राहकांचे प्रत्येक व्यवहारात शोषण होत आहे. ग्राहकांचे मोठया प्रमाणावरील अज्ञान, उदासीन वृत्ती, त्याचे असंघटीत स्वरुप यामुळे विक्रीव्यवहारात संघटित व्यापारी वर्गाच्या पुढे हा ग्राहक दुबळा होत आहे. मी स्वत: व्यापारी वर्गात असूनही या विषयावर स्पष्टोक्ती देतांना मला अभिमान वाटतो कारण ग्राहकांचे प्रबोधन होऊन त्यांना न्याय मिळण्यातच मी धन्यता मानतो असे श्री.चंद्रात्रे यावेळी म्हणाले.
            ग्राहकांच्या न्याय व हक्कासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सदैव तत्पर आहे. परंतु ग्राहकांमधील उदासिनता व प्रबोधनाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सदसय्‍ तथा ग्रंथमित्र आण्णा धुमाळ यावेळी म्हणाले. प्रत्येक ग्राहकाने ग्राहक संरक्षण कायद्याचा अवलंब केल्यास ग्राहक राजा हे ब्रिदवाक्य चिरकाल टिकविण्यासाठी नक्कीच मदत होईल असेही ते यावेळी म्हणाले.
            यावेळी तालुका प्रशासनातील विविध विभाग प्रमुखांनी त्यांची भुमीका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदेश निकुंभ यांनी केले तर आभार नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले.

* * * * * * * *

Tuesday, 14 March 2017

चाळीसगांव पंचायत समितीच्या सभापती/उपसभापती पदाची निवड प्रक्रीया संपन्न

चाळीसगांव पंचायत समितीच्या
सभापती/उपसभापती पदाची निवड प्रक्रीया संपन्न
             
       चाळीसगाव दि. 14 (उमाका वृत्तसेवा) :  पंचायत समिती, चाळीसगांव सार्वत्रिक निवडणूक-2017 करिता झालेल्या मतदानाच्या अनुषंगाने  सभापती व उपसभापतीच्या निवड प्रक्रियेसाठी आज पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी पिठासीन अधिकारी म्हणून उप विभागीय अधिकारी शरद पवार यांनी कामकाज पाहिले.
            यावेळी एकूण 14 गणातील विजयी उमेदवार (सदस्य) उपस्थित होते. सकाळी 11:00 ते 01:00 यावेळेत उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आले. सभापती पदासाठी सौ.स्मितल दिनेश बोरसे (बहाळ-गण), सौ.लता बाजीराव दौंड (पिपरखेड-गण) यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले तर उपसभापती पदासाठी  श्री.संजय भास्कर पाटील (पातोंडा-गण) व सौ.सुनिता जिभाऊ पाटील (रांजणगांव-गण) यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले.
            माघारीसाठी दिलेल्या मुदतीत कुणीही माघार न घेतल्यामुळे 03:30 मिनीटांनी सदस्यांनी हात उंचाऊन मतदान करण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये वर्णमालीकेनुसार उमेदवाराचा क्रम निश्चित करुन सभापती पदासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये सौ.स्मितल बोरसे यांना सात मते तर सौ.लता दौंड यांना सहा मते मिळाल्याने सभापती पदासाठी सौ.स्मितल दिनेश बोरसे (पक्ष-भाजपा) यांना सर्वाधिक मते मिळाल्याने विजयी घोषीत करण्यात आले.

              उपसभापती पदासाठी श्री.संजय भास्कर पाटील यांना सात मते तर सौ.सुनिता जिभाऊ पाटील यांना सहा मते मिळाल्याने उपसभापती पदासाठी श्री.संजय भास्कर पाटील (पक्ष-भाजपा) यांना सर्वाधिक मते मिळाल्याने विजयी घोषीत करण्यात आले.

            यावेळी गट विकास अधिकारी मधुकर वाघ, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिरसाठ तसेच पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कायदा सुव्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
                                                        * * * * * * * *

Friday, 10 March 2017

चाळीसगाव येथे जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन : तहसिलदार कैलास देवरे

चाळीसगाव येथे जागतिक ग्राहक
दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
                                                       : तहसिलदार कैलास देवरे

       चाळीसगाव दि. 10 (उमाका वृत्तसेवा) : ग्राहक अन्यायाविरुध्द उपाय योजना करतांना जागृत ग्राहक, संघटीत ग्राहक शक्ती, ग्राहक कायद्याचे ज्ञान व  त्याअनुषंगाने समाज समर्पित जागृत ग्राहक निर्मीतीसाठी जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधत  दिनांक 15 मार्च, 2017 रोजी  जागतिक ग्राहक दिन 2017 साजरा करण्यात येत आहे. तहसिल कार्यालयात सकाळी 11:00 वाजता ग्राहकांचे प्रबोधन, चर्चासत्र व प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाचे आयोजन तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी शरद पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा आशालता चव्हाण, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव बाबासाहेब चंद्रात्रे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र पाटील, ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष रमेश सोनवणे, ग्रंथमित्र आण्णा धुमाळ उपस्थित राहणार आहेत.
या जागतिक ग्राहक दिनानिमीत्ताने ग्राहक प्रबोधनाकरिता वजनमाप, अन्न व भेसळ, गॅस संबंधीचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे.  ग्राहक प्रबोधनामध्ये ग्राहकांचे हक्क, ग्राहकाने खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, ग्राहक संरक्षण कायदा, तक्रार कोण करु शकतो, तक्रार कोठे दाखल करावी, अपील कसे दाखल करावे या बाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होऊन जागृत ग्राहक निर्मीतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी, ग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

* * * * * * * *

चाळीसगाव नगरपरिषदेत जागतीक महिला दिनी दिनदयाळ अंत्योदय योजना अभियान संपन्न

चाळीसगाव नगरपरिषदेत जागतीक महिला दिनी
दिनदयाळ अंत्योदय योजना अभियान संपन्न

       चाळीसगाव दि. 10 (उमाका वृत्तसेवा) :  जागतीक महिला दिनाचे औचित्य साधत चाळीसगाव नगरपरिषदेने दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीवीका अभियानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.आशालता चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  श्रीकृष्ण भालसिंग व नगरसेवक राजेंद्र चौधरी  होते.
           कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित सर्व मान्यवरांनी दिप प्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करून केले. चाळीसगाव शहरात दिनदयाळ अत्योंदय योजना –राष्ट्रीय नागरी उपजीवीका अभियानांतर्गत एकता महिला वस्तीस्तर संघ, श्री.गणेश महिला वस्तीस्तर संघ, जिजाऊ महिला वस्तीस्तर संघ, संघर्ष महिला वस्तीस्तर संघ या बचत गटांच्या संघाना नोंदणी प्रमापत्रांचे  मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
           महिला बचत गटांच्या शहरस्तर संघाच्या अध्यक्षा  संगीता अमृतकार यांनी आपल्या मनोगतात इतिहातील महान स्त्रियांचे दाखले देवून समाजाच्या जडण-घडणीत महिलांचे योगदान स्पष्ट केले.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय सांगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शितल पाटील यांनी केले .कार्यक्रम यशस्तीतेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरणकुमार निकुंभ, सोनाली मोगलाईकर, रोहिणी फिरके यांनी परिश्रम घेतले. 

* * * * * * * *

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकखात्याचा तपशिल देणे अनिवार्य : तहसिलदार कैलास देवरे

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना
राष्ट्रीयकृत बँकखात्याचा तपशिल देणे अनिवार्य
                                                              : तहसिलदार कैलास देवरे

       चाळीसगाव दि. 10 (उमाका वृत्तसेवा) :  शासनातर्फे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, विधवा, अपंग निवृत्ती वेतन योजना व महाराष्ट्र शासनाकडील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणा-या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृध्दापकाळ योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांची अद्यापपावेतो आपले राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक व आधारकार्डची झेरॉक्स तहसिल कार्यालय, चाळीसगाव येथील संजय गांधी शाखेत जमा करावयाचे राहिले असतील अशा चाळीसगाव तालुक्यातील सर्व  लाभार्थ्यांनी दिनांक 25 मार्च 2017 पर्यंत आपले आधार कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची  झेरॉक्स त्वरीत तहसिल कार्यालयातील संजय गांधी शाखेकडे जमा करण्याचे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी केले आहे.
             शासन ध्येय धोरणानुसार 1 एप्रिल,2017 पासुन DBT अन्वये लाभार्थ्याना अनुदान देण्याच्या सूचना असल्याने लाभार्थ्यांचे खाते पोस्ट अगर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असतील अशा सर्व लाभार्थ्यांनी  त्वरीत राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून जुने व नवे पासबुक व आधारकार्डची झेरॉक्स तहसिल कार्यालतील संजय गांधी योजना शाखेकडे जमा करावी.
            तरी सर्व संबंधित लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँक खात्याचा तपशिलासह आधारकार्डची झेरॉक्स, संजय गांधी शाखेकडे दिनांक 25 मार्च, 2017 पर्यंत जमा करावी अन्यथा त्यांचे माहे एप्रिल 2017 नंतरचे अनुदान बंद होवू शकते याची सर्व संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी असे तहसिलदार श्री.कैलास देवरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

* * * * * * * *