जिल्हा
परिषद व पंचायत समिती निवडणूक
मतमोजणीसाठी
प्रशासन सज्ज
: प्रातांधिकारी शरद पवार
चाळीसगाव दि. 21 (उमाका वृत्तसेवा) : तालुक्यातील 07 गट व
14 गणांसाठी 16 फेब्रुवारी, 2017 रोजी पार
पडलेल्या मतदानाची मतमोजणी गुरूवार दि. 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 10:00
वाजेपासून य.ना.चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव येथे होणार असून
त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी शरद
पवार यांनी कळविले आहे.
निवडणूक
निरीक्षक तथा अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक अनिल लांडगे
यांच्या निरीक्षणाखाली सकाळी 10:00 वाजता सुरु होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी
एकूण 28 टेबल लावण्यात आले असून एका गटासाठी दोन टेबल तर एका गणासाठी एक टेबल अशी
संरचना करण्यात आली आहे, तर टपाली मतमोजणीसाठी एक स्वतंत्र टेबल लावण्यात आला आहे.
सर्व गटासह गणाची एकाच वेळी मतमोजणी होणार असून प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक
सहाय्यक व एक शिपाई अशा प्रकारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात
आल्या आहेत. या ठिकाणी 4 रो ऑफीसर, 8 मॅन्युअल टॅब्युलेशन पथक, 4 संगणकीय टॅब्युलेशन
पथक तर सुरक्षा कक्षातून ईव्हीएम मशीन ने-आण करण्यासाठी 12 कर्मचारी अशा 112
अधिकारी कर्मचारी तर टपाली मतमोजणी पथकातील 9 असे एकूण 121 अधिकारी कर्मचाऱ्यांची
नियुक्ती निवडणूक निर्णय अधिकारी शरद पवार
यांनी केली आहे.
मतमोजणी
साठी पोलीस प्रशासनही सज्ज
तालुक्यातील
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतमोजणीसाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित
राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून मतमोजणी प्रक्रियेसाठी 1 उप विभागीय पोलीस
अधिकारी, 2 पोलीस निरीक्षक, 10 उप पोलीस निरीक्षकांसह 100 पोलीस कर्मचाऱ्यांचा
फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विशेषत: या मतमोजणी प्रक्रियेच्या वेळी शहरातील
कुठलाही मार्ग बंद करण्यात येणार नसून यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मतमोजणीच्या कालावधीत उमेदवारांच्या
प्रतिनीधींनी नगर पालीकेच्या ग्राऊंडवर आपले वाहन पार्कींग करावे, रोडवर तसेच
इतरत्र वाहन पार्कींग करुन वाहतुकीची कोंडी टाळावी. नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाने मतमोजणी
कालावधीत कुठलाही मार्ग बंद न केल्याने
वैयक्तीक वाहनाएैवजी सार्वजानिक वाहनाचा वापर करुन परिसरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत
राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे उप विभागीय
पोलीस अधिकारी अरविंद पाटील व पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment