जलक्रांतीचे
स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी
उपयुक्त
ठरेल जलयुक्त शिवार योजना
: ना.गिरीष महाजन
चाळीसगाव
दि. 12 (उमाका वृत्तसेवा) : राज्यात जलक्रांतीचे स्वप्न
प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरेल असा
विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.गिरीष
महाजन यांनी आज केले. चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील जलयुक्त शिवार योजनेच्या
जलपुजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत
होते.
यावेळी तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील, सरपंच देविदास
साळुंखे, तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, कृषी उत्पन्न
बाजार समितीचे संचालक मच्छिंद्र राठोड, विश्वजीत पाटील, खेडगांवचे सुपुत्र तथा
आयबीएन लोकमतचे प्रफुल्ल साळुंखे, समन्वय समिती सदस्य सुनिल साहेबराव पाटील,
राजेंद्र चौधरी, किरण साळुंखे, जि.प.सदस्य प्रभाकर जाधव, पं.स.सदस्य जगन्नाथ महाजन
व धनंजय मांडोळे, मार्केट कमीटी सदस्य ॲङ राजेंद्र सोनवणे, पंचायत समितीचे माजी
सभापती संजय पाटील, साहेबराव साळुंखे, हेमंत साळुंखेंसह पंचक्रोशीतील गावकरी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना.श्री.महाजन म्हणाले, जलयुक्त शिवार
अभियान हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या
माध्यमातून पथदर्शी काम होणार असून या कामातून संपुर्ण राज्यातील गावे जलयुक्त
होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर जलसंपदा विभागामार्फत प्रथमच
खरेदी करण्यात आलेल्या यंत्रसामुग्रीचा शुभारंभ खेडगांव पासुन करण्यात आल्याने या
गावातील कामेही पथदर्शी ठरतील असे त्यांनी यावेळी नमुद केले.
पुढे बोलतांना ना.श्री.महाजन म्हणाले की, विवाह सोहळा व
आजारपण यांच्या खर्चामुळे बेजार होऊन मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असतात, मात्र
आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतुन कुठल्याही गंभीर आजाराच्या उपचारासाठी
आर्थिक पाठबळ उभे करण्याची सामाजीक जबाबदारी स्विकारत गरजुंनी थेट संपर्क
साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील म्हणाले, जलयुक्त
शिवार योजना ही शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने समृध्द करण्याची योजना आहे. मात्र जुवार्डी, खेडगांव, खेडी, पोहरे येथील लघु
पाटबंधारे अंतर्गत असलेल्या जुन्या पाटचाऱ्यांची दुरूस्ती तसेच डाव्या पांझण कालव्यातंर्गत
असलेल्या पाटचाऱ्यांची दुरुस्ती निधीअभावी प्रलंबीत असून त्यास शासनाने निधी
पुरविण्याची मागणी केली. तर ना.श्री.महाजन यांनी खेडगांवसह पंचक्रोशीतील गावांना
जलसमृध्द करण्यासाठी शासन स्तरावरुन सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी
दिले.
यावेळी खेडगावचे सुपूत्र प्रफुल्ल साळुंखे यांनी गावाच्या
विकासासाठी पक्षभेद बाजूला सारून विकासकामांना चालना देण्यासाठी जलसंपदा
मंत्र्यांना निवेदन देत गावातील 12 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी 160
कोटी खर्च अपेक्षीत आहे मात्र हे संपुर्ण
क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शासनाचे कृषी, रोहयो व जलसंपदा विभाग एकवटून तसेच
अपेक्षीत लोकसहभाग मिळाल्यास केवळ 6 कोटीमध्ये पुर्ण करण्याचा विश्वास व्यक्त
केला. त्यास गावकऱ्यांनीही भरभरुन प्रतिसाद यावेळी दिला.
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment