Thursday, 4 December 2014

चाळीसगांव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

चाळीसगांव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा
पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

            चाळीसगांव,दिनांक 04:-  चाळीसगांव तालुक्यातील माहे जानेवारी  ते  एप्रिल 2015 दरम्यान मुदतपुर्ण होणा-या व विभाजनामुळे तसेच नव्याने अस्तीत्वात आलेल्या एकूण नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणूक तथा पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाला असून तालुक्यातील निवडणूक होणा-या 9 ग्रामपंचायतींच्या निवडणूक कामी नेमलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी,  रिक्त जागा व प्रभागनिहाय आकडेवारी व आरक्षण कंसात दर्शविण्यात आले आहे. (1) वडगांव लांबे - श्री.एस.बी.बोरसे, रिक्त जागा 1, प्रभाग क्रमांक 3, आरक्षण (अ.जा.), (2) वलठाण- श्री.आर.एस.मोरे, रिक्त जागा 1, प्रभाग क्रमांक 3, आरक्षण (इ.मा.व.), (3) आडगाव- श्री.बी.आर.सोनवणे, रिक्त जागा 1, प्रभाग क्रमांक 2, आरक्षण (अ.ज.स्त्री), (4) बोरखेडा बु.- श्री.ए.वाय.काळोखे, रिक्त जागा 1, प्रभाग क्रमांक 2, आरक्षण (इ.मा.व.), (5) जामडी प्र.ब.- श्री.ए.बी.जाधव, रिक्त जागा 1, प्रभाग क्रमांक ३, आरक्षण (सर्वसाधारण) (6) पिंपळवाड निकुंभ - श्री.पी.बी.राठोड, रिक्त जागा 2, प्रभाग क्रमांक 2, आरक्षण (अ.ज.1/सर्वसाधारण स्त्री 1), (7) चिंचखेडे- श्री.ए.जे.निकुंभ, रिक्त जागा 1, प्रभाग क्रमांक 2, आरक्षण (सर्वसाधारण), (8) जुनोने- श्री.एस.आय.शेख, रिक्त जागा 1, प्रभाग क्रमांक 2, आरक्षण (अ.ज.), (9) पिंप्री बु.प्र.दे. श्री.डी.जे.राजपुत, रिक्त जागा 1, प्रभाग क्रमांक 3, आरक्षण (अ.जा.)
            चाळीसगांव तालुक्यात होणा-या नऊ ग्रामपंचात निवडणूकीचा कार्यक्रम असा 1 डिसेंबर, 2014 निवडणूकीची अधिसुचना जारी, दिनांक 4 ते 8 डिसेंबर 2014 ऑनलाईन नामनिर्देशन दाखल, 9 डिसेंबर, 2014 नामनिर्देशनपत्रांची छाननी,  11 ‍डिसेंबर, 2014 नामनिर्देशन मागे घेणे, चिन्ह वाटप व माघारीनंतर अंतीमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे, 23 डिसेंबर, 2014 सकाळी 07:30 ते सायंकाळी 05:30 दरम्यान मतदान व मतमोजणी
            निवडणूकीत भाग घेणा-या उमेदवारांनी या निवडणूकीत ऑनलाईन पध्दतीने नामनिर्देशन दाखल करावयाचे असल्याने ग्रामपंचायतीच्या संग्राम कक्षात याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र खेरीज नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही याची नोंद घ्यावी  तसेच निवडणूक कालावधीत जिल्हाधिका-याकडून जारी होणा-या जमावबंदी तथा दारुबंदीच्या आदेशाचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन  तहसिलदार तथा  ग्रामपंचायत निवडणूक प्राधिकृत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment