नागरिकांनी मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा !
:तहसिलदार बाबासाहेब गाढवे
चाळीसगांव,दिनांक 29:-
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र
राज्य व जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांचे आदेशान्वये दिनांक 1
डिसेंबर ते 16 डिसेंबर, 2014 या कालावधीत विधानसभा मतदार संघात छायाचित्र मतदार
याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे या साठी दिनांक
01 जानेवारी, 2015 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली असून चाळीसगांव विधानसभा
मतदार संघातील नागरिकांनी प्रशासनाकडून
मतदार नोंदणी मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा
तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी एका प्रसि ध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
नागरिकांनी आपल्या नावाची मतदार यादीत
खात्री करण्यासाठी www.ceo.maharashtra.gov.in या
वेबसाईटचा उपयोग करावा तसेच आपले नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागीय कार्यालय,
व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा
तहसिलदार यांच्या कार्यालयात मतदार याद्या पहावयास मिळणार आहेत. प्रारुप
मतदार यादी प्रसिध्दी दिनांक 01 डिसेंबर, 2014, दावे व हरकती स्विकारण्याचा
कालावधी दिनांक 01 डिसेंबर, 2014 ते 16
डिसेंबर, 2014, मान्यताप्राप्त राजकीय
पक्षाचे BLA यांचे उपस्थितीत दावे व हरकती
स्वीकारणेच्या विशेष तारखा दिनांक 07 व 14 डिसेंबर, 2014, दावे व हरकती निकाली
काढणे दिनांक 15 जानेवारी, 2014 , मतदार यादी अद्यावत करणे दिनांक 20 जानेवारी,
2015 व अंतीम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 21 जानेवारी, 2015 असा
कार्यक्रम आखण्यात आला असून विशेष
मोहिमेच्या तारखांना मतदान केंद्राच्या ठिकाणी बी.एल.ओ. मार्फत मतदार नोंदणीचे
फॉर्म स्विकारले जातील. मतदार नोंदणीच्या विशेष कार्यक्रमात चाळीसगांव विधानसभा
मतदार संघातील सर्व मतदार, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी सक्रीय भाग घेऊन
निवडणूक यंत्रणेला सहकार्य दिल्यास त्या अचूक व परिपर्णू होण्याची खात्री बाळगता
येईल या साठी सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment