लोहारी साजगांव पानंद रस्त्यापासून प्रेरणा घेऊन
परधाडे-वडगांव टेक शिवाररस्ता झाला मोकळा
पाचोरा,दिनांक 04:- तालुक्यातील लोहारी-साजगांव पानंद रस्ता
लोकसहभागातून मोकळा होऊन लोकवर्गणीतुन रस्त्याची डागडुजी करुन वाहतुकीसाठी खुला
करण्यात आल्याचे वर्तमान पत्रातील बातम्यांमधून समजताच परधाडे येथील शेतकरी
श्री.वसंत पाटील यांनी लगतच्या आठ-दहा शेतक-यांसह प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांची
भेट घेतली व लोहारी-साजगांव पानंद रस्ता
ज्या सामंजस्यातुन व लोकसहभागातून शेतक-यांसाठी शिवार रस्ता म्हणून मोकळा करण्यात
आला त्याच धर्तीवर परधाडे-वडगांव टेक शिवार रस्त्याचेही काम लोकवर्गणीतुन करुन
देण्याची सहमती दर्शविली या कामी
प्रांताधिकारी या नात्याने आपण पुढाकार घेऊन शासनाच्या या मोहिमेत
आम्हालाही सहभागी करुन घ्यावे अशी विनंती केली.
प्रातांधिका-यांनी केली 15 ऑगस्ट रोजी
प्रत्यक्ष पहाणी
प्राताधिकारी श्री.गणेश मिसाळ,
तहसिलदार गणेश मरकड, नायब तहसिलदार आबा महाजन यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकारी,
तालुका भुमी निरीक्षक, भूमापक यांच्यासह सर्वांनी
शिवाराची पहाणी केली. प्रांताधिका-यांनी ग्रामीण गाडी मार्ग साडे सोळा फूट
ते एकविस फुटाचा असतो या विषयी सांगितल्यावर सर्व संबंधित शेतक-यांनी लागलीच
अतिक्रमण काढून शिवार रस्त्याच्या मोजणीला
संमती दिली तेंव्हा दोन्ही बाजुच्या शेतात कापूस पिकांच्या दोन ओळींचे नुकसान होणार
होते. तरीही लोकसहभागाचा उत्साह पहाता नुकसानीची पर्वा कुणीच केली नाही.
लोकवर्गणीमध्ये श्री.रमेश बळीराम पाटील, श्री.बाळू बळीराम पाटील, श्रीमती गयाबाई
पंडीत पाटील, श्री.गोपाळ किसन पाटील, श्री.सुभाष काशिनाथ पाटील, श्री.रविंद्र
उत्तमराव पाटील यांनी लोकवर्गणी गोळा करुन जेसीबी मशिन भाडयाने आणून दोन
गावांचा शिवार रस्ता मोकळा करण्यात आला
सायंकाळी सर्व शेतक-यांच्या आग्रहास्तव प्रांताधिकारी, नायब तहसिलदार यांनी
शेतक-यांसह शेतात बसून झुणका भाकरीचा आस्वादही घेतला.
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment