रमजान ईद निमित्त जिल्हयात मद्यविक्री बंद
जळगाव, दि. 25 :- मुस्लिम बांधवांचा
रमजान ईद हा सण साजरा 29 जून 2014 होणार
आहे. हा उत्सव शांततेत व सुरळीतपणे पार पडावा, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये
म्हणून जळगाव जिल्हयात मुंबई दारुबंदी
कायदा 1949 चे कलम 142 अन्वये दिनांक 29 जुलै 2014 रोजी सर्व महानगरपालिका,
नगरपरिषद , नगरपालिका (जळगाव, भुसावळ,
मुक्ताईनगर, एरंडोल, धरणगाव, चोपडा, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, यावल, रावेर,
सावदा, फैजपुर, पाचोरा, भडगाव, बोदवड, जामनरे) व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या
क्षेत्रातील मद्य विक्रीच्या सर्व अनुज्ञप्त्या (सिएल-3/सिएल/ एफएल / टिडी-3,
एफएल-2, एफएल -3, एफएल -2, एफ एल / बी आर -2 व ताडीची दुकाने) बंद राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द
कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी, जळगाव यांनी जारी केले आहेत.
* * * * * * * *
अतिसार नियंत्रण पंधरवाड्यात
घरोघरी ओआरएस पाकीटांचे वाटप
जळगाव, दि.25- ज्या ज्या घरात 0 ते 5 वर्षे वयाची बालके आहेत
त्या प्रत्येक घरोघरी दि.28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत पाळल्या जाणा-या अतिसार
नियंत्रण पंधरवाड्यात ओआरएस पाकीटांचे वाटप आशा, अंगणवाडी व आरोग्यसेवकांच्या
मार्फत केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत देण्यात
आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रभारी
जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी
गुलाबराव खरात होते. या बैठकीत त्यांनी या पंधरवाड्यानिमित्त राबवावयाच्या विविध
उपक्रमांची माहिती घेऊन आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी
पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शेळके,
बालरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर सिकची, डॉ.
सविता मोकादम, डॉ. मनिषा उगले आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी माहिती देतांना डॉ. पवार
म्हणाले की, होणा-या बालमृत्यूच्या प्रमाणात अतिसार (डायरिया) हे कारण असण्याचे
प्रमाण 20 टक्के आहे. त्यामुळे लहान बालकांना या अतिसाराची लागण होऊ न देणे ,
झाल्यास त्यांना ओआरएसचे द्रावण पाजणे , झिंक सल्फेटच्या गोळ्या देणे यासारखे उपाय
आहेत. जिल्ह्यात ज्या ज्या घरात 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालके आहेत त्या त्या घरात
एक ओआरएस पाकिट दिले जाणार आहे. त्यासाठी आशा, अंगण्वाडी सेविका, आरोग्य सेवक-
सेविका यांची यंत्रणा वापरली जाणार आहे. या शिवाय याच कालावधीत स्तनपान सप्ताह
साजरा होत असून स्तनपानाचे महत्त्व, पाणि शुद्धिकरणाचे महत्व, त्यासाठी राखावयाची स्वच्छता याबाबत जनजागृती
केली जाणार आहे. महापालिका व अन्य नगरपालिका क्षेत्रातही याच पद्ध्तीने हा उपक्रम
राबविला जाणार असल्याचे डॉ.पवार यांनी सांगितले.
वाटप
केले जाणारे ओआरएस पाकीटे हे मातांपर्यंत पोहोचतील याची दक्षता घ्या तसेच सदरची
माहिती ही विविध माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावी अशी सुचना श्री. खरात यांनी
केली. तसेच अतिसार सोबतच अन्य आजारांचाही प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी
संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
* * * * * * * *
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे रविवारी शिबीर !
जळगाव, दि. 25 :- जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण, तसेच जिल्हा वकिल संघ जळगाव यांच्या
संयुक्त विदयमाने अनुसुचित जाती / जमातीचे अधिकार व त्यासंबंधीचे कायदे व तंबाखु सेवनाचे दुष्परीणाम याबाबत रविवार दिनांक 27 जुलै 2014 रोजी सकाळी 10.00 वा.
मार्गदर्शन शिबिर अजिंठा हौसिंग सोसायटी, अजिंठा चौफुली, जळगाव येथे आयोजित
करण्यात आले आहे.
या शिबीरात डॉ.निलेश चांडक, कॅन्सर तज्ञ, जळगाव हे तंबाखु
सेवनाचे दुष्परीणाम, अनुसुचित जाती / जमातीचे अधिकार व त्यासंबंधीचे कायदे या
विषयावर ॲड.सुभाष तायडे हे मार्गदर्शन करणार असुन अनुसुचित जाती / जमातीसाठी
असणारे विविध सरकारी उपक्रमा विषयी एस.आर.पाटील, समाजकल्याण अधिकारी, हे
मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यक्रमास उपस्थित राहुन मार्गदर्शनाचा
लाभ घ्यावा असे आवाहन अधिक्षक जिल्हा विधी
सेवा प्राधिकरण जळगाव यांनी पत्रकान्वये
केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment