निरंतर मतदार नोंदणी व वगळणी कार्यक्रम सुरु
चाळीसगाव, दिनांक 4
जून :- 017
चाळीसगांव विधानसभा मतदार संघात मतदार यादींमध्ये मयत व दुबार मतदारांच्या नावांच्या याद्या तयार
करण्यात आलेल्या आहेत. करिता निरंतर
मतदार नोंदणी व वगळणी मोहिम 29 मे, 2014 पासून सुरु करण्यात आली आहे.
तरी चाळीसगांव मतदार संघातील मतदारांनी
या मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन मतदार नोंदणी
अधिकारी तथा उपविभागीय
अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी
केले आहे.
दिनांक
13.04.2014 ते 22.04.2014 या कालावधीत बी.एल.ओ. यांनी घरोघरी जाऊन केलेल्या सर्व्हेक्षणानुसार 017 चाळीसगांव विधानसभा मतदार संघात यादी भाग
क्रं. 1 ते 325 मध्ये एकूण मयत मतदारांची
संख्या 6535 असून यामध्ये 3664 पुरुष तर 2871 स्त्री मतदारांचा समावेश आहे. तसेच
दुबार मतदार संख्या 1370 असून यामध्ये 785 पुरुष तर 585 स्त्री मतदारांचा
समावेश आहे.
मयत
व दुबार मतदारांची वगळणी ही पडताळणी करुनच करावयाची असल्याने मयत व दुबार मतदारांच्या याद्या अवलोकनार्थ
आमदारांसह सर्व राजकीय पक्ष , प्रांत कार्यालय, तहसिल कार्यालय, संबंधीत
गावांचे तलाठी व शहरातील मतदारांसाठी मुख्याधिकारी
न.प.चाळीसगांव यांचे कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन
प्रत्येक मतदारांने आपल्या नावाची मतदार यादीत नाव असल्याची खातरजमा व पडताळणी
करुन घ्यावी.
मा.भारत
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दिनांक 01.01.2014
या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादींचा
विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम दिनांक 9 जून ते 30 जून 2014 या कालावधीत
होत असून यामध्ये नवीन नाव नोंदणी, यादीतील नावास आक्षेप अथवा नाव वगळणी, यादी
तपशिलातील दुरुस्ती, यादीतील नोंदीचे स्थानांतर
या कामी आवश्यक असलेले नमुना फॉर्म
क्रं. 6 ते 8 व 8-अ भरुन तसेच फोटो
नसलेल्या मतदारांनी फोटो संबंधीत बी.एल.ओ. यांचेकडे जमा करावेत ज्या मतदारांची
नांवे यापूर्वी वगळली गेली असल्यास किंवा मतदार यादीत नाव आलेले नसल्यास संबंधीतांनी
नव्याने फॉर्म नं.6 भरुन देण्याचे आवाहनही
मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागिय अधिकारी, मनोज घोडे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment