चाळीसगाव येथील निवडणुक प्रशिक्षण शिबीरास
जिल्हाधिका-यांनी केले मार्गदर्शन
चाळीसगाव, दिनांक
18 एप्रिल :- जिल्हा
निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी येथील वैभव मंगल
कार्यालयात आयोजित अखेरच्या निवडणुक प्रशिक्षण शिबीरास भेट देऊन उपस्थित अधिकारी व
कर्मचा-यांना निवडणुक कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक निवडणुक
निर्णय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, उप विभागीय पोलीस
अधिकारी प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, मुख्याधिकारी रविंद्र जाधव,
नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, नायब तहसिलदार व्हि.पी.सुर्यवंशी, नायब तहसिलदार
ए.एम.परमार्थी यांच्यासह महसुल व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठया
संख्येने उपस्थित होते.
येथील अखेरच्या प्रशिक्षण शिबीरात
मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी मतदान अधिका-यांना दिनांक 23 व 24
तारखेच्या कार्यपध्दतीबाबत योग्य त्या सुचना देऊन निवडणुक कामाची महत्वपुर्ण
जबाबदारी आपल्यावर असुन ती योग्यरितीने पार पाडण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी
उपस्थितांना केले.
यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय
अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी सांगितले की, चाळीसगांव मतदार संघात एकूण 327 मतदान
केंद्र असुन एकुण उमेदवारांची संख्या 21 असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर दोन
बॅलेट युनिट व एक कंट्रोल युनिट असणार आहे. असे या मतदार संघात एकुण 654 बॅलेट
युनिट व 327 कंट्रोल युनिट राहणार असुन याच्या 10 टक्के जादा बॅलेट युनिट व
कंट्रोल युनिट हे राखीव ठेवण्यात येणार आहे. याकरिता पुर्व तयारी म्हणून या बॅलेट
युनिट व कंट्रोल युनिटची तपासणी व मुलभूत सेटींग्ज करण्यासाठी अधिकारी व
कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर येत्या दोन दिवसात सेटींग्ज व सिलींग चे
कामकाज पुर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या वेळी तहसिलदार बाबासाहेब गाढवे
यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर मुलभूत गरजा जसे फर्निचर, विज, पाणी आदि सोईसुविधा
उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे सांगितले तर आचारसंहिता कक्ष प्रमुख नानासाहेब आगळे
यांनी आचारसंहिता भंगाच्या एकूण 3 तक्रारी प्राप्त झाल्या असुन पैकी 2 तक्रारी
अर्ज निर्गत व एक तक्रार अर्ज खुलास्या अभावी प्रलंबीत असल्याची माहिती यावेळी दिली.
No comments:
Post a Comment