यशस्विनी
सामाजिक अभियानाच्या
एक दिवशीय
कार्यशाळेचे उद्घाटन
चाळीसगाव, जि.
जळगाव, दिनांक
10 :- पुरुष
प्रदान संस्कृतीवर मात करुन यशस्विनी सामाजिक अभियान निश्चित कौतुकास्पद असल्याचे
आमदार राजीव देशमुख यांनी आज एक दिवशीय कार्यशाळेचे उदघाटन प्रसंगी केले. लोकनेते
कै.अनिलदादा देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक 9 ते 12 जानेवारी,2014
दरम्यान कृषि उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव येथे कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात
आले त्या अनुषंगाने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात या एक दिवशीय
कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी
जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख, यशिस्विनीच्या जिल्हा समन्वयीका तिलोत्तमा
पाटील, नगराध्यक्षा अनिता चौधरी, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती रोहिदास पाटील,
प्रमोद पाटील, जालम पाटील, शाम देशमुख, प्रदिप निकम, प्रदिप अहिरराव, मधुकर चौधरी,
दिलीप पाटील, सिमा पाटील, राजश्री पाटील, चित्रा पाटील यांच्यासह आदि मान्यवर व
बचत गटाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
प्रसंगी
आमदार देशमुख म्हणाले की यशस्विनी सामाजिक अभियानाच्या संचालीका खा.सुप्रिया सुळे
यांनी बचत गटाच्या माध्यमातुन मोठी चळवळ उभी केली आहे. आणि या अभियानाला जिल्हयासह
राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजच्या या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले
यशस्विनीचे मास्टर ट्रेनर आपल्याला उद्योगिनी विकास या विषयावर माहिती पटाव्दारे
माहिती व मार्गदर्शन करणार असून याचा सर्व बचत गटातील महिलांनी लाभ घ्यावा असे
आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिमा पाटील यांनी केले
तर आभार चित्राताई पाटील यांनी मानले.
* * * * * * * *
एक गाव एक
वाण हि संकल्पना शेतक-यांनी राबवावी
चाळीसगाव, जि.
जळगाव, दिनांक 10
:- एक गाव एक वाण ही संकल्पना राबवून कांद्याच्या बिजोत्पदनावर लक्ष केंद्रीत केले
पाहिजे तसेच हवामानाचा बदल लक्षात घेऊन लागवडीचे वेळापत्रक ठरविल्यास शेतक-याला
नक्कीच फायदा होईल असे आवाहन कृषि विद्यापीठ राहुरी येथील श्रीधर देसले यांनी
चाळीसगाव येथील कृषि प्रदर्शनात शेतक-यांना केले. कै.अनिलदादा देशमुख यांच्या
स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या या कृषि प्रदर्शनाला तालुक्यातील शेतक-यांचा
चांगला प्रतिसाद असून शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठीच्या व्यासपिठावरुन
बोलतांना त्यांनी आ.देशमुख यांचे आभार मानले.
यावेळी चर्चासत्रात
मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.श्रीधर देसले, श्री.नाथराव कराड, श्री.जे.एस.राऊत,
डॉ.श्री.टाले उपस्थित होते. श्री.राऊत
यांनी मार्गदर्शनात माती परिक्षणाचे महत्व विषद करुन सांगितले, मातीचा नमुना
घेण्याची पध्दत, आधुनिक तंत्रज्ञानाचे अवलोकन या विषया बरोबरच शेतक-यांनी आपल्या
शेतीतील मातीचे नमुने येथील लॅब मध्ये आणून मोफत माती परिक्षण करुन घ्यावे असे
आवाहनही उपस्थित शेतकरी बांधवांना केले. या कार्यक्रमासाठी आमदार राजीव देशमुख,
मार्केट कमिटीचे सभापती आर.एल.पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप देशमुख, शाम
देशमुख, प्रदिप निकम, तालुका कृषि अधिकारी व्हि.एस.शिंदे आदि मान्यवरांसह शेतकरी
मोठया संख्येने उपस्थित होते.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment