आगामी सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक संपन्न
सिंहस्थ कुंभमेळाचे नियोजनाची माहिती
दोन दिवसात सादर करण्याचे आदेश
अपर मुख्य सचिव -अमिताभ राजन
नाशिक दि 11 :- सिंहस्थ कुंभमेळाचे सुयोग्य नियोजन व
अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणानी गेल्या एक वर्षापासून केलेल्या कामाची सद्यस्थिती
व प्राप्त निधीची माहिती येत्या दोन दिवसात गृहमंत्रालयात सादर करावी असे आदेश
राज्याचे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी नाशिक येथे जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आगामी सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत मार्गदर्शन
करतांना आज दिले.
ही माहिती प्राप्त होताच संबंधित विभागाच्या उच्चस्तरीय
अधिका-याकडे निधी व कामाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करणे शक्य होणार आहे. आगामी
सिंहस्थ कुंभमेळातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस आयुक्त व
नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षकांनी अधिक दक्ष राहून आराखडा तयार करावा. साधुग्राम व
शाही मिरवणुक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच या ठिकाणी
बंदोबस्तासाठी असणा-या अधिकारी व कर्मचा-यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन
द्याव्यात असेही राज्याचे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी यावेळी
सांगितले.
जनहित लक्षात घेवून टाळता न येणारी खाजगी जमिन संपादनाची
कामे तातडीने पुर्ण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देवून नाशिक विभागाचे
महसुल आयुक्त रवींद्र जाधव म्हणाले निलपर्वतावरील
रस्त्याचे काँक्रटीकरण व तिळनंदी येथील त्रिशुळ उभारणीसाठी सार्वजनिक
बांधकाम विभागाने अधिक सर्तक राहावे. पावसाळयाच्या कालावधीत सिंहस्थ पर्वण्या येत
असल्या तरी या परिसरातील घाटाचे पाणी शुध्दीकरण्यासाठी ही वेळीच नियोजन करण्याची
आवश्यकता आहे.
प्रारंभी जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी गेल्या महिन्यात
17 ऑक्टोबर रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीची
बैठकीत इतिवृत्ताची माहिती देवून प्रत्येक विभागाने सिंहस्थ कुंभमेळासाठी
अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतुद करुन घ्यावी असे सांगितले. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार
सरंगल, पोलिस अधिक्षक प्रविण पडवळ,महापालिका आयुक्त संजय खंदारे ,जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर, सिंहस्थ कुंभमेळा कक्षाचे उपजिल्हाधिकारी
महेश पाटील आदिसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
* * * * * * * * *
No comments:
Post a Comment