माध्यमांची जबाबदारी नैतिकतेच्या वकीलीची
: विनोद रापतवार यांचे प्रतिपादन
जळगाव,
दिनांक 16 -
लोकशाहीचा चवथा स्तंभ असणा-या माध्यमांवर नैतिकतेच्या धोरणांची वकीली करण्याची
जबाबदारी आहे ,असे प्रतिपादन जैन उद्योग
समूहाचे जनसंपर्क अधिकारी विनोद रापतवार यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय
पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघ,
जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवनाच्या पद्मश्री भंवरलाल जैन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “ जनहित सेवेमध्ये माध्यमांची भूमिका
” या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे हे उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकार
संघाचे अध्यक्ष हेमंत काळुंखे, कार्यवाहक अशोक भाटीया, ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण जळूकर
आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना रापतवार म्हणाले की, इतिहासात डोकावतांना
पत्रकाराची भूमिका ही नेहमी जागल्याची राहिली आहे, असे आपणास दिसते. या देशातील सर्वसामान्य
नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण राज्यघटनेने केले आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ हे आपल्या
अधिकारांबद्द्ल अधिक जागरुक दिसतात. साहजिकच कर्तव्याच्या जाणीवा अधिक वृद्धिंगत करण्याची
जबाबदारी आपणा सा-यांवर आहे. अलिकडच्या काळात सोशल नेटवर्किंगच्या प्रसारामुळे प्रसारणावर
कुणाचे नियंत्रण राहिलेले नाही. मात्र अशावेळी आपण आपल्या नैतिकतेच्या धोरणाच्या वकीलीची
जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
या
कार्यक्रमास पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद पाटील, उपाध्यक्ष कैलास शिंदे, दिलीप शिरुडे,
राजेश यावलकर तसेच रितेश भाटीया, हेमंत पाटील, संजय निकुंभ आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश सानप यांनी केले. कार्यक्रमास
पत्रकार तसेच शहरातील मान्यवर प्रतिष्ठीत नागरीक, महिला आदी उपस्थित होते.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment