जळगांव. दि. 29 :-
सामाजिक न्याय क्षेत्रात काम करणा-या संस्थांना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने
शाहु, फुले, आंबेडकर पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. यासाठी जळगांव
जिल्हयातील सामाजिक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविणा-या संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल व
मागासवर्गीय घटकातील व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्य, पुर्नवसन ,
रोजगार, अशा व यासारख्या व्यक्तीगट व सामुहिक क्षेत्रामध्ये एकमेव अव्दीतीय कार्य
केलेले असले पाहिजे. संस्था वरील क्षेत्रामध्ये 15 वर्षापेक्षा अधिक वर्ष कार्यरत
असली पाहीजे या इतर अटीची पुर्तता करणा-यां संस्थांना पुरस्कार देवून गौरविण्यात
येणार आहे . तेव्हा संस्थांनी दिनांक 6 ऑगस्ट 2013 पर्यत प्रस्ताव सहाय्यक आयुक्त,
समाजकल्याण कार्यालय, जळगांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, मायादेवी
मंदीराजवळ, महाबळ, जळगांव या कार्यालयाकडे तीन प्रतीत प्रस्ताव सादर करावा. उशिरा
येणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी असे श्री. व्ही. ए. पाटील,
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, जळगांव यांनी कळविले आहे
No comments:
Post a Comment