Tuesday, 9 July 2013

सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचा-यांसाठी भडगांव येथे आमसभा



              जळगांव, दि. 9 :- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगांव तसेच अधिपत्याखालील सार्वजनिक बांधकाम उपविभागात कार्यरत असलेल्या शासकीय अधिकारी  / कर्मचा-यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी दिनांक 23 जुलै 2013 रोजी ठिक 14.30 वाजता सा. बा. उपविभाग, भडगांव येथे आमसभा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता तथा अध्यक्ष सा. बा. जिल्हास्तरीय पदोन्नती समन्वय समिती, जळगांव या नात्याने सा. बा. विभागाच्या कर्मचा-यांच्या वर्ग 4 मधुन वर्ग 3 मध्ये पदोन्नती संबंधीत काही अडचणी अथवा या विभागाच्या अधिपत्याखालील वर्ग 4 कर्मचाच्या अडचणी व समस्या असल्यास त्यांनी आपले म्हणणे दिनांक 20 जुलै 2013 पर्यत लेखी स्वरुपात कार्यकारी अभियंता, सा. बा. विभाग, जळगांव यांच्याकडे तात्काळ कळविण्यात यावे. जेणेकरुन प्राप्त होणा-या अडचणी व समस्याबाबत दिनांक 23 जुलै 2013 रोजी निराकरण करण्यात येईल. असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगांव यांनी (क) यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment