जळगांव, दि. 17 :- सर्व शाळा व कनिष्ठ
महाविद्यालयातील क्रीडांगणे युवतींसाठी आठवडयातून विशिष्ट दिवशी राखीव ठेवण्यात
यावीत, असे शासनस्तरावरुन कळविण्यांत आलेले आहे.
सध्या जी क्रीडांगणे उपलब्ध आहेत,
त्यांची संख्या पुरेशी नाही आणि जी आहेत तिथे मुले अधिक काळ खेळत असतात. सबब,
युवतींना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होत नाहीत.
त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयात
युवतींसाठी आठवडयातील निवडक दिवस क्रीडांगण राखीव ठेवण्यात यावे, जेणेकरुन युवतीही
मनसोक्तपणे क्रीडांगणाचा वापर करु शकातील.
सदर बाबीचा अहवाल शासनास सादर
करावयाचा असल्याने आपल्या शाळा / महाविद्यालयातील उपलब्ध
क्रीडांगणे, उपलब्ध सोयी - सुविधा व कोणत्या दिवशी क्रीडांगण युवतींसाठी राखीव
ठेवणार आहात, याचा अहवाल उलट टपाली तात्काळ या कार्यालयास सादर करावा , असे आवाहन
जिल्हा क्रीड अधिकारी, सुनंदा पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment