जळगांव, दि. 12 :- जामनेर व भडगांव तालुक्यातील सर्व माजी सैनिक / विधवा व
त्यांचे अवलंबितांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता गठीत केलेल्या समितीची बैठक बुधवार
दिनांक 17/7/2013 रोजी सकाळी 11.30 व
गुरुवार दिनांक 19/7/2013 रोजी सकाळी 11.30 वा. तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली
आयोजित केलेली आहे. तरी संबंधित तालुक्यातील माजी सैनिक / अवलंबितांनी बैठकीस
उपस्थित रहावे. त्यांच्या अडीअडचणी लेखी
स्वरुपात दोन प्रतीत आणव्या व बैठकीस हजर राहून आपले प्रकरण तहसिलदारांना पुढील
कार्यवाहीसाठी सादर करावे असे आवहन कॅप्टन मोहन कुलकर्णी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,
जळगांव यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक -480
दिनांक -12 जुलै 2013
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे अर्ज ऑन लाईन
भरावे
जळगांव,
दि. 12 :- जळगांव जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य / मुख्याध्यापक यांना
कळविण्यात येते की, सामाजिक न्याय विभाग जिल्हा परिषद जळगांव या कार्यालयामार्फत
इयत्ता 5 वी ते 10 वी तील अनु-जाती व विमुक्त जाती, भटक्या जमाती या संवर्गातील
मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते. सदर योजना ऑनलाईन करण्यात आली असून
या योजनेच्या अर्जाचा नमुना तसेच इतर महत्वाच्या सूचना https;//; mahaeschol.maharashtra.gov.in
या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. शाळेतील विद्यार्थीनींचे अर्ज ऑनलाईन भरण्याची
जबाबदारी ही शाळेचे प्राचार्य / मुख्याध्यापक यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.
याची नोंद सर्व प्राचार्य / मुख्याध्यापक यांनी घ्यावी, असे जिल्हा समाजकल्याण
अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment