Monday, 15 July 2013

बेरोजगार युवकांसाठी 50 टक्के अनुदानावर शेळी व बोकड गटाचे वाटप



               जळगांव, दि 15 :- जळगांव जिल्हयामध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत 40 शेळी व 2 बोकड गटाची वाटप योजना सन 2013 - 2014 या वर्षात राबविण्यांत येणार आहे
              सदरील योजना 50 टकके अनुदानावर राबविण्यांत येणार असून एक गटाची किंमत रु  300,000/- योजनेचा लाभ्‍ सर्व प्रवर्गासाठी खुला असून जळगांव जिल्हयातील अवर्षण प्रवण क्षेत्रग्रस्त असलेल्या 7 तालुक्यांमध्ये मुक्ताईनगर, अंमळनेर, चाळीसगांव, पारोळा, पाचोरा, जळगांव, जामनेर राबविण्यात येणार आहे लाभार्थी निवड सर्व प्रवर्गातील बेरोजगार युवकांचीच प्राधान्याने निवड करण्यांत येणार आहे यामध्ये 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्याना प्राधान्य देण्यात येईल.
               या योजनेसाठीचे अर्ज संबंधित तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती यांचेकडे दिनांक 5 ऑगस्ट 2013 पर्यतच स्विकारण्यांत येणार आहे अर्ज भरण्यासाठी संबंधितांना आवश्यक कागदपत्रांची माहिती व विहित नमुन्यांतील अर्ज पंचायत समिती येथे उपलब्ध होतील अशा प्रकल्प योजनेसारखा व तत्सम व्यक्तीगत लाभाचा पूर्वी लाभार्थीने लाभ घेतला असेल तर या प्रकल्पा अंतर्गत लाभ्‍ अनुज्ञेय राहणार नाही
               या प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या लाभार्थींना सर्व प्रथम स्वहिस्याचे रक्कमेतून शेळी गटाचे निवा-याचे बांधकाम व इतर मुलभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक रहिल लाभार्थीने शेळी गटाची खरेदी ही महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांचे प्रक्षेत्रावरुनच करणे आवश्यक राहील असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगांव योनी कळविले आहे

1 comment:

  1. nashik mahiti sahayyak
    nahsik sathi varil yojana lagu ahet ka?

    pls call mo.9021085501
    navnath aher
    thanks

    ReplyDelete