जळगांव, दि. 4
:- जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक अल्पबचत सभागृहात कृषी राज्यमंत्री तथा
पालकमंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . या बैठकीत मार्च
2013 पर्यत सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उप योजना, आदिवासी
क्षेत्रा बाहेरील उपयोजना यांचा खर्चाचा आढावा घेण्यात आला.
प्रारंभी उत्तराखंडामध्ये झालेल्या जलप्रलयांत
मृत्यूमुखी पडलेले भाविक व दिवंगत
झालेल्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली व सभेचे
कामकाज सुरु झाले.
प्रारंभी जिल्हाधिकारी तथा नियोजन
समितीचे सदस्य सचिव ज्ञानेश्वर राजूरकर यांनी मार्च अखेर झालेल्या खर्चाची माहिती
दिली. यात सर्व साधारण योजना, अनुसूचित उप
योजना, आदिवासी उप योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत एकूण मंजूर
नियतव्यय 305 कोटी 87 लाख अर्थ संकल्पीय निधी 304
कोटी प्राप्त तरतूद 225
कोटी 39 लाख वित्तीय तरतूद 292
कोटी वित्तीय तरतूद त्यापैकी झालेला खर्च 289
कोटी 74 लाख खर्च झाला असून
खर्चाची टक्केवारी 950.09 टक्के इतकी आहे.
सन 2013-2014 या वर्षात जिल्हा
वार्षीक योजनेत मे 2013 पर्यत मंजूर नियतव्यय 319 कोटी 84 लाख अर्थ संकल्पीत निधी
310 कोटी 69 लाख असून प्राप्त तरतूद 261 कोटी 9 लाख इतका आहे.
बैठकीत 29/12/2012 रोजी झालेल्या
नियोजन समितीच्या इतिवृत्ताचे वाचन करुन त्यास मंजूरी देण्यात आली यात
प्रामुख्याने ग्रामीण भागाचा सर्वागिण विकास करण्याच्या उदे्दशाने जिल्हा नियोजन
समितीच्या प्रत्येक सदस्यास विविध विकास कामे करण्यासाठी 10 लाख रुपये निधी देण्याबाबत सूचना मांडण्यात
आली.
बैठकीत तालुका क्रीडा संकुलाचे
बांधकाम, व्यवसाय शिक्षण, अंमळनेर येथे साने गुरुजीचा पुतळा उभारणे, जिल्हयातील
आरोग्य सेवा, ग्रामीण भागातील दवाखान्यांसाठी औषध पुरवठा ग्रामीण पाणी पुरवठा,
इंदिरा आवास योजना, आधार कार्डाची उपलब्धता, महिला व बाल विकास योजनेअंतर्गत
अंगणवाडयांचे बांधकाम, अनुसूचित जातीच्या
विद्यार्थ्याना व निवडणुकीस उभे राहण्याच्या उदेशाना अनुसूचित जातीचे वैध दाखले
देणे, विद्युत विकास व विद्युत ग्राहकांच्या तक्रारी, गौण खनिज, वन पर्यटन विकास
कामे आदि विषयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस विधानसभेचे विरोधीपक्षनेते ना. एकनाथराव खडसे, जि. प. अध्यक्ष ना. दिलीप
खोडपे, खासदार हरिभाऊ जावळे, खासदार ए. टी. पाटील, आमदार सर्वश्री दिलीप वाघ, चिमणराव पाटील, जगदिश वळवी, गिरीश
महाजन, साहेबराव पाटील, शिरीष चौधरी, राजीव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक एन.
अंबीका, आदिवासी विकास अप्पर आयुक्त हिंगोणीकर, जिल्हा नियोजन अधिकारी राणे,
प्रकल्प अधिकारी दुधाळ, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त पाटील, जिल्हा
नियोजन समितीचे सर्व सदस्य, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी तसेच नागरिक
मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment