जळगांव, दि. 4 :- चाळीसगांव येथील
मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वस्तीगृहामध्ये
अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, विमुक्ती जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय विदयार्थ्यानींना
प्रवेश देण्यात येतो.
वस्तीगृहामध्ये इयत्ता 8 वी, 11 वी,
एफ. वाय.बी.ए. बी. कॉम , बी. एस्सी, व इतर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षापासून
प्रवेश देण्यात येतो. प्रवेशीत विदयार्थीनीना शासनामार्फत मोफत निवास, दोनवेळेचे
भोजन, क्रमीक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, दरमहा 600 प्रमाणे निर्वाह भत्ता, व
शालेय गणवेश इत्यादी सोयीसुविधा विनामुल्य पुरविण्यात येतात. तरी गरजु
विदयार्थींनींनी शासकीय वस्तीगृह, चाळीसगांव येथे शासकीय सुटीचा दिवस सोडुन संपर्क
साधावा असे अधिक्षिका मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृह, चाळीसगांव जि जळगांव
यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment