जळगांव, दि. 29 :- पश्चिम महाराष्ट्र
विकास महामंडळातर्फे दि. 2 मे 2013 पासून सामुहिक प्रोत्साहन योजनेखाली
पूनर्जीवनक्षम नसलेल्या आजारी बंद उद्योग घटकांसाठी विशेष अभय योजना जाहीर करण्यात
आली आहे. अशा उद्योग घटकांना विशेष अभय योजनेव्दारे सुलभ निर्गमन पर्याय (इझी
एक्झिट ऑप्शन) उपलब्ध करुन देण्यास शासनाकडून मान्यता मिळाली आहे. सदरहू योजना एक
वर्षासाठी लागू राहील.
या योजनेचा फायदा घेण्यासाठी उद्योग
घटकाने पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या कुबेरा चेंबर्स, दुसरा मजला, संचेती
हॉस्पीटल समोर, शिवाजीनगर, पुणे 411005 येथील कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क
साधावा.
No comments:
Post a Comment