जळगांव दि. 29 :- जिल्हा व्यवसाय
शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, जळगांव या कार्यालयाने दि. 2 जुलै 2013 रोजी अधिक दोन
स्तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांतील इयत्ता 12 वीत उत्तीर्ण झालेल्या
विद्यार्थ्यासाठी (ॲप्रेंटिस) भरती मेळावा शासकीय तांत्रिक विद्यालय, जी. एस.
ग्राऊंडच्या बाजुला, जळगांव येथे सकाळी 12.30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तरी
सर्व इयत्ता 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यानी सदर मेळाव्याचा लाभ घ्यावा.
असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व
प्रशिक्षण अधिकारी, जळगांव यांनी केलेले आहे.
No comments:
Post a Comment