Friday, 8 March 2013

जळगांवकरांनी ग्रंथोत्सवास भेट दयावी -- जिल्हाधिकारी



       जळगांव दिनांक 8 :- ग्रंथ वाचनामुळे मानवी बुध्दीचा विकास घडून येतो. तसेच समाज ही सुसंस्कृत बनतो. त्यामुळे जळगांवकर नागरिकांनी ग्रंथोत्सवास भेट देऊन ग्रंथ खरेदी करुन शासनाच्या वाचन संस्कृती वृध्दीगंत अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले आहे.
        महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व माहिती व जनसंपर्क महासंचानलाय अंतर्गत जळगांव जिल्हा माहिती कार्यालय यांचे संयुक्त विदयामाने दिनांक 13 ते 15 मार्च, 2013 या कालावधीत व. वा. वाचनालयाचे नविन व जुने सभागृह येथे ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवात ग्रंथाली प्रकाशन मुंबई, ज्ञानगंगा प्रकाशन पुणे, वैशाली प्रकाशन पुणे, जन उन्नती भांडार नाशिक, ग्रंथमोहन बुक शेलर नाशिक, शासकीय मुद्रणालय औरंगाबाद आदि प्रकाशन संख्या/ बुक डेपोचे ग्रंथ विक्री बाबतचे सुमारे 25 स्टॉल लावले जाणार आहेत.
        त्यामुळे जळगांवकर नागरिकांना पुस्तक प्रदर्शन व खरेदीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध प्रकारची खाजगी प्रकाशन संस्थाबरोबरच शासकीय मुद्रणालयाची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत.
          तरी जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रंथोत्सवास भेट देऊन पुस्तकांची खरेदी करावी. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना ही उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथोत्सव संयोजन समितीमार्फत करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment