जळगांव,
दि. 30 :- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत कानळदा पाणी पुरवठा योजनेला
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाकडून मंजूरी मिळाली असून सदर योजनेंच्या
कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे हस्ते कानळदा येथ्पे गिरणा नदी पात्राच्या बाजूला करण्यात
आले.
यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता
समितीचे अध्यक्ष मधुकर मुरलीधर भंगाळे, सचिव श्रीमती कमलाबाई शांताराम मोरे, संजय
चव्हाण, गोकुळ चव्हाण, ग्रामीण पाणी
पुरवठा योजनेचे उप अभियंता ए. एन.
पाटील, शाखा अभियंता एस. डी. डहाके आदिसह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ
मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर पाणी पुरवठा योजनेसाठी 2 कोटी 24 लाख 70
हजार रुपये निधी मंजूर झाला असून सदरचे काम रोहित कन्स्ट्रक्शन कं. नांदेड यांना
देण्यात आलेले आहे. सदरचे काम ठेकेदाराने 18 महिन्यात पूर्ण करावयाचे आहे. तरी सदर
ठेकेदाराने पाणी पुरवठा योनजनेचे काम चांगल्या प्रतीचे व दिलेल्या मुदतीत पूर्ण
करण्याची सूचना ना. देवकर यांनी केली.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment