Monday, 11 March 2013

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदर्श आश्रम शाळेत प्रवेश



    जळगांव, दि. 11 :- आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागांतर्गत असलेल्या आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा, ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे सन 2013-14 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी मध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी स्पर्धा परिक्षा दिनांक 7 एप्रिल 2013 रोजी आयोजित करण्यात आली आहे. जे आदिवासी विद्यार्थी सन  2012-13 या शैक्षणिक वर्षामध्ये इयता 4 थीच्या वर्गात शिकत असून, परीक्षेला बसलेले आहेत. व पुढील वर्षी इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश घेणार आहेत. अशा विद्यार्थ्या करीता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गंगापूरी , ता. जामनेर, जि. जळगांव, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद, ता. अमळनेर जि. जळगांव या दोन केंद्रांवर परिक्षा आयोजित करण्यात येत आहे.
          जे अनुसूचित जमातीचे विद्यार्थी आदर्श् आश्रमशाळा, देवमोगरा मध्ये प्रवेश घेवू इच्छीतात अशा विद्यार्थ्यानी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकामार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगांव यांचेकडे दिनांक 7/3/3013 पर्यत अर्ज करावेत. सदर परिक्षा शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा व इतर मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेले इयत्ता 4 थीत शिकत असलेल्या अनु. जमातीच्या विद्यार्थ्याकरीता पूर्णत: खुला आहे. व सदर परिक्षा पूर्व मध्यमिक शिष्यवूत्ती परिक्षा धर्तीवर आधारित आहे. तथापि विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न रुपये एक लाख आठ हजाराच्या आत असावे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश परिक्षेचा अर्ज गट शिक्षण अधिकारी, पंचायत समितीच्या किंवा प्रकल्प कार्यालयातून उपलब्ध करुन घ्यावा. व या योजनेचा लाभ घ्यावा. अशी सुचना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास, प्रकल्प यावल, जि. जळगांव  हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment