Monday, 14 January 2013

ना. देवकर यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाच्या कंपाऊंड वॉलच्या कामाचे भूमीपूजन

              जळगांव, दि. 14 – धरणगांव तालुक्यातील मौजे पथराड खुर्द येथील सामाजिक सभागृहा भोवतीच्या कंपाऊंड वॉल बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
                यावेळी सरपंच रामकृष्ण भावसार, दिलीप धनगर, उपविभागीय अभियंता श्री. सुरवाडे, शाखा अभियंता जी. आर. सोनार आदिसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
               सभागृहाचा परिसर स्वच्छ व सुरक्षित राहावा व गावांमध्ये रोगराई पसरु नये म्हणून स्थानिक आमदार निधीतून सदरच्या कंपाऊंड वॉलच्या बांधकामाकरिता ना. देवकर यांनी 5 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. यावेळी पथराड खुर्द येथे शासकीय योजनेतून सार्वजनिक शौचालये बांधण्यात आलेले आहे. सदरच्या शौचालयाच्या कामाची पाहणी पालकमंत्री ना. देवकर यांनी केली.

No comments:

Post a Comment